जळगाव : NMU अंतर्गत बहि:स्थ अभ्यासक्रमांच्या परीक्षा

nmu jalgaon latest marathi news
nmu jalgaon latest marathi newsesakal
Updated on

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाद्वारा (NMU) घेण्यात येणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील उन्हाळी २०२२ च्या नियमित व बहि:स्थ विविध अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात (एमसीक्यू) सुरू झाल्या आहेत.


विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार उन्हाळी २०२२ परीक्षांची कार्यपद्वती व परीक्षेच्या स्वरूपाबाबत तसेच त्यातील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात ऑफलाइन परीक्षांसाठी फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही, असे विद्यापीठाने यापूर्वीच संलग्न महाविद्यालयांना कळविण्यात आले होते. (Exams for External Courses under NMU jalgaon latest Marathi news)

nmu jalgaon latest marathi news
शहरात मुलींच्या जन्मदरात घट; मागील वर्षाच्या अहवालातून बाब स्पष्ट

तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित विचारात घेऊन ऑफलाइन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात ओएमआर उत्तरपत्रिकेवर घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी गुणपडताळणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ज्यांना गुणपडताळणी करावयाची आहे, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करावयाचा आहे. विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून २१ दिवसांपर्यंत विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

nmu jalgaon latest marathi news
Nashik : अखेर पंचवटीतील पाणीपुरवठ्यात सुधारणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.