Son Bhagwan and daughter-in-law Jija Here along with Kamalabai who donated a kidney to the child
Son Bhagwan and daughter-in-law Jija Here along with Kamalabai who donated a kidney to the childesakal

Jalgaon Exclusive Story : वृद्ध आईने किडनी देऊन मुलाला दिला पुनर्जन्म

Published on

पाचोरा : आई ही जन्मदाती असते. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी अशा शब्दात आईची महती वर्णन केली जाते. आई एकदा मुलास जन्म देत असली तरी कुऱ्हाड येथील वृद्ध आईने आपल्या मुलास स्वतःची किडनी देऊन त्यास पुनर्जन्म दिला आहे.

कुऱ्हाड येथील भगवान हिरे (वय ४७) हे आजारी पडल्यानंतर त्यांना उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी किडनी खराब असल्याचे निदान करून उपचाराचा सल्ला दिला. आर्थिक बाजू जेमतेम असणाऱ्या हिरे कुटुंबीयांनी जळगाव, औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई याठिकाणी भगवान हिरे यांना उपचारार्थ दाखल करून बराच पैसा खर्च केला. (Exclusive Story Old mother gave a kidney to her child and reborn him Jalgaon News)

Son Bhagwan and daughter-in-law Jija Here along with Kamalabai who donated a kidney to the child
Jalgaon News : k. k. Girls शाळेत कुकरचा स्फोट

परंतु प्रकृती सुधारली नाही. डॉक्टरांनी किडनी बदलविण्याचा सल्ला दिला व लवकर किडनी बदलवली नाही तर दुसरी किडनीही निकामी होण्याचे स्पष्ट केले. किडनी आणावी कोठून? एवढा पैसा कसा व कोठून उभा करायचा? या प्रश्रांनी हिरे कुटुंबीय कमालीचे चिंताग्रस्त झाले.

अशा परिस्थितीत भगवान हिरे यांच्या वृद्ध आई कमलबाई हिरे यांनी मुलाला पुनर्जन्म देण्यासाठी आपली किडनी देण्याची तयारी दर्शवली. त्यावेळी साऱ्या हिरे कुटुंबीयांच्या डोळ्यात अश्रू आले. सर्व चाचण्या पूर्ण केल्यानंतर औरंगाबाद येथे कमलबाई पाटील यांची किडनी काढून ती भगवान हिरे यांना बसविण्यात आली. दोघांची प्रकृती सुखरूप असून, भगवान हिरे यांची पत्नी जिजा हिरे व त्यांच्या दोन्ही मुली पती व पित्यास जीवदान मिळाल्याने आनंदले आहेत.

Son Bhagwan and daughter-in-law Jija Here along with Kamalabai who donated a kidney to the child
Jalgaon News : ठेवी परत करण्यासाठी लवकरच पॅकेज; सहकारमंत्री अतुल सावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()