Bhusawal Railway: भुसावळ रेल्वेत 4 महिन्यांत पायाभूत सुविधांचा विस्तार; स्वयंचलित सिग्नल व्यवस्था, लूप लाइनवर भर

Employees during the extension of the loop line near Mandwa station under the division.
Employees during the extension of the loop line near Mandwa station under the division. esakal
Updated on

Bhusawal Railway: भुसावळ रेल्वे विभागाने गेल्या चार महिन्यात भुसावळ विभागात विविध ठिकाणी पायाभुत सुविधांचा विस्तार केला आहे. यामुळे रेल्वे गाड्या धावण्याचा वेग वाढणार असल्याची माहिती प्रथम महिला विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) इति पांडे यांनी दिली. भुसावळ रेल्वे विभाग आपले नवीन पायाभूत सुविधा प्रकल्प अतिशय वेगाने पूर्ण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२३ या ४ महिन्यांत भुसावळ रेल्वे विभागाने १२ नवीन पायाभूत सुविधांची कामे पूर्ण केली आहेत. म्हणजे दर १० दिवसांनी भुसावळ विभागाने १ नवीन पायाभूत सुविधेचे काम पूर्ण केले आहे. (Expansion of infrastructure in Bhusawal Railway in 4 months jalgaon news)

प्रभावी कामे अशी

ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२३ मध्ये भुसावळ विभागातील उल्लेखनीय पायाभूत सुविधा अशा-

स्वयंचलित सिग्नलिंग कमिशनिंग - तांत्रिक झेप घेताना, भुसावळ रेल्वे स्टेशन ते बोदवड या १८.८ किलोमिटरच्या भागामध्ये नवीन स्वयंचलित सिग्नलिंग कार्यान्वित केले.या सिस्टीममध्ये सिग्नल्सची संख्या वाढवली असल्याने जास्त गाड्या पाठवता येतील.यामुळे गाड्यांचा वेग वाढेल, गाड्यांचा खोळंबा कमी होईल. त्यात जास्त गाड्या चालवता येतील.

भुसावळ जवळील मांडवा स्टेशन- २ लूपलाइनचा विस्तार पूर्वीच्या ६९० मीटरवरून ७५३ मीटरपर्यंत वाढविला. भुसावळ जवळील दुसखेडा स्टेशन- अप आणि डाऊन मेनलाइन आणि लूपलाइनचा विस्तार पूर्वीचा ६९० मीटर वरून ७५३ मीटर पर्यंत वाढविला.

Employees during the extension of the loop line near Mandwa station under the division.
Jalgaon News: मतदारसंघाच्या विकासासाठी मुख्यमंत्री शिंदेंसोबतच : आमदार चिमणराव पाटील

नाशिक जवळील लहवित स्टेशन- अप आणि डाऊन लूपलाइनचा विस्तार पूर्वीचा ६९८ मीटर वरून ७६० मीटर पर्यंत, अस्वली स्टेशन- अप लूपलाइनची लांबी ६७६ मीटर वरून ७५९ मीटर करण्यात आली. डाऊन लूपलाइनची लांबी ६९४ मीटर वरून ७७९ मीटर करण्यात आली. ओढा स्टेशन- लूपलाइन्सचा विस्तार ६९० मीटर ते ७५० मीटरपर्यंत, डोंगरगाव स्टेशन- लूपलाइनचा विस्तार ६९० मीटर ते ७५० मीटरपर्यंत वाढविण्यात आला आहे.

नवीन इंटरमीडिएट ब्लॉक स्टेशन

नाशिक जवळील लहवित आणि देवळालीदरम्यान नवीन इंटरमीडिएट ब्लॉक सेक्शन (आयबीएस) सुरू केल्याने अखंड रेल्वे वाहतूक परिचालन क्षमता वाढली आहे. पहिल्या ट्रेनने हे नवीन आयबीएच स्टेशन ओलांडल्यानंतर, दुसरी ट्रेन लहवित सेक्शनवरील देवलालीला पाठवता येईल.

Employees during the extension of the loop line near Mandwa station under the division.
Jalgaon Winter Update: जिल्ह्यात थंडीच्या लाटेने भरली हुडहुडी! जनजीवन प्रभावित शेकोट्यांनी ऊब मिळविण्याचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.