Rajya Natya Spardha 2023 : संहितेत फसलेला प्रयोग : म्याडम

Scenes from the play 'Madam' performed at the State Drama Competition on Thursday.
Scenes from the play 'Madam' performed at the State Drama Competition on Thursday.esakal
Updated on

Rajya Natya Spardha 2023 : महाराष्ट्र शासनाच्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सातत्याने यशस्वी होणारा संघ, लेखक आणि दिग्दर्शक अशा त्रयींचे नाटक असल्याने म्याडमचा प्रयोग पाहायला रसिक प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती.

पण म्हणतात ना, आडात नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार, या न्यायाने सर्व काही चांगले असतानाही एकांकिकेच्या संहितेचा विस्तार करताना लेखक फसला आणि एक अपेक्षाभंग करणारा हृषीकेश तुराईलिखित, विशाल जाधव दिग्दर्शित ‘म्याडम’ हा नाट्यप्रयोग समर्थ बहुउद्देशीय संस्था जवखेडे बुद्रुक यांनी सादर केला.(Experiment Trapped in Code mama rajya natya spardha 2023 jalgaon news )

प्रत्येक कथानकाचा एक ठराविक आत्मा आणि आवाका असतो. त्यानुसार त्याचे नाटक वा एकांकिका असे होत असते. मात्र विषयाची ओढताण करून तिचा आवाका वाढविण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रयोग फसतो, असेच काहीसे ‘म्याडम’ या नाटकाचे झाले. वर्षभर विविध स्पर्धांतून यशस्वी ठरलेल्या ‘म्याडम’ या एकांकिकेवरच राज्य नाट्यमध्ये नाटक करण्याचा प्रयत्न केला.

पण संघाच्या कॅप्टनचा निर्णय चुकला, तर त्याचे परिणाम पूर्ण संघाला भोगावे लागतात, तसेच झाले. संवादांची अनावश्यक पुनरावृत्ती, संथ सादरीकरणामुळे कलावंतांच्या सशक्त अभिनय व तांत्रिक बाजूंचे उत्कृष्ट सहकार्य लाभूनही ‘म्याडम’चा प्रयोग रंगला नाही. उपलब्ध संहितेचा आवाका ओळखता न आल्याने, वेळेचे नियोजन करताना दिग्दर्शक विशाल जाधव यांची तारांबळ उडालेली दिसते.

गावातील अशिक्षित असणारी मंगल (युगंधरा ओहोळ) शिक्षणाचे महत्त्व पटल्याने आपली मुलगी सुमन (शुभांगी वाडिले) हिला शिक्षित करण्याचा निर्धार करते. प्रसंगी त्यासाठी स्वतःही शिक्षण घेते आणि मुलीला सुशिक्षित करून म्याडम (शिक्षिका) बनवते. एवढाच तो कथानकाचा पैस. यात सुमनसोबत त्यांच्या शेजारची मुलगी चिंगी (पूर्वा जाधव) लाही शिक्षणाची गोडी लागते.

युगंधरा ओहोळ सुरवातीपासूनच आपली पकड नाट्यावर प्रभावीपणे दाखवतात, तेवढीच प्रभावी ठरते, ती शुभांगी वाडिले यांची सुमन. त्यांच्या साथीला रुक्मिणी (पूजा जोशी), पुरुष (सागर सदावर्ते, मयूर भंगाळे), मूल (मनन वर्मा), सत्यित जोशी, समर्थ जाधव, भावेश पाटील, विशाल सदावर्ते), मुलगी (राशी ससाणे) यांनी साथ दिली.

Scenes from the play 'Madam' performed at the State Drama Competition on Thursday.
Rajya Natya Spardha 2023: नात्याच्या पलीकडचे नात जपणारे ‘रा+धा=’

तांत्रिक बाजूंमध्ये अमोल जाधव (प्रकाश योजना), रविकुमार परदेशी (नेपथ्य), महेश कोळी (पार्श्वसंगीत), योगेश लांबोळे (रंग व वेशभूषा) प्रभावी व नाट्यास पूरक अशीच होती. अंकुश काकडे, संकेत राऊत, रवींद्र चौधरी, कमलेश भोळे, किशोर मराठे, अक्षय पाटील, श्रीकृष्णा बारी, शुभम सपकाळे यांची रंगमंच व्यवस्था चोख होती.

तांत्रिक बाजूंचे उत्तम सहकार्य व कलावंतांचे चांगले सादरीकरण असतानाही कमकुवत संहितेमुळे प्रयोग रंगला नसला तरी, वैयक्तिक पातळीवर चांगले सादरीकरण करणाऱ्या समर्थ बहुउद्देशीय संस्था, जवखेडे बुद्रुकच्या कलावंत व तंत्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन!

आजचे नाटक

‘पेढे घ्या पेढे’

लेखक : राहुल सोनवणे

दिग्दर्शक : प्रदीप भोई

लोकरंजन बहुउद्देशीय संस्था, जामनेर

Scenes from the play 'Madam' performed at the State Drama Competition on Thursday.
Rajya Natya Spardha 2023: ज्येष्ठांच्या एकटेपणाचा ‘खेळ मांडियेला’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.