Jalgaon News : गृहपाठाचा बोजा नको... स्वरूपही बदलायला हवे!

Homework
Homeworkesakal
Updated on

जळगाव : इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गृहपाठाची सक्ती नसावी याबाबत मंथन सुरू असले, तरी एकदम गृहपाठच नको, हे धोरण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने योग्य नाही. गृहपाठाचा सध्याचे अतिरिक्त बोजा असल्याचे स्वरूप बदलून वर्गपाठाचे आकलन, त्यावरील लेखन व चिंतन, असे ते असायला हवे, अशी भूमिका शालेय स्तरावर कार्यरत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली. (Expert opinion Comprehension of class text emphasis on writing with revision in school studies jalgaon news)

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अलीकडच्या काळात पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद केला जाणार असल्याबाबत भूमिका मांडली. मात्र, या भूमिकेवर शिक्षणक्षेत्रात विविध पातळीवरून विभिन्न मते व्यक्त होताना दिसतांय.

गृहपाठाचे सध्याचे स्वरूप अयोग्य

सध्या जवळपास सर्वच शाळांमधून विद्यार्थ्यांना गृहपाठाच्या स्वरूपात लिखाण दिले जाते. बऱ्याचदा त्याचा बोजा अतिरिक्त झाल्यामुळे पालकांना तो पूर्ण करून द्यावा लागतो. त्यातून मुलांसह पालकांवरही नाहक दडपणे येते. परिणामी, मुले अभ्यासापासून दूर जातात.

उपक्रमांवर अतिरिक्त भर

सर्वसाधारणपणे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून दररोज मुलांना विविध प्रकारचे उपक्रम (प्रोजेक्ट) करून आणायला सांगितले जाते. त्याचाही ताण मुलांसह पालकांवर पडतो. अनेकदा घरी पालकच हे प्रोजक्ट पूर्ण करून देतात. मुलांना त्यातील काहीही कळत नाही. हा प्रकारही गृहपाठाचा भाग मानला जातो.

Homework
Eknath Shinde : नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ; विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

वर्गपाठाची उजळणी, आकलन हाच खरा गृहपाठ

याउलट गृहपाठाचे सध्याचे स्वरूप बदलणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात. वर्गात जे शिकवले जाते, त्याची घरी पालकांच्या मदतीने उजळणी करून घेणे, त्यासंदर्भात काही छोटे लेखन, पाठांतर.

काही वेळेस त्यात शंका, प्रश्‍न असल्यास त्याची नोंद करून ठेवणे व दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांकडून त्याचे निरसन करून घेणे, असे खऱ्या गृहपाठाचे स्वरूप आहे. त्यामुळे या उजळणी, सरावसंच व आकलनावर गृहपाठात अधिक भर हवा, तरच मुलांचा शैक्षणिक विकास होईल, यावरही तज्ज्ञांचे एकमत झाले.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

Homework
Nashik News: येवला पोलिस निरीक्षक मथुरे यांची चौकशी; फडणवीस यांची विधानपरिषदेत घोषणा

"गृहपाठात वर्गपाठावर आधारित वाचन, मनन, लेखन शंकांचे निरसन करून पुन्हा लेखन हे अपेक्षित आहे. मात्र, गृहपाठाच्या प्रक्रियेतील या पायऱ्याच सध्याची शिक्षण व्यवस्था विसरली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत मुले वाचन, लेखन, गणित सोडविणे, या गोष्टी विसरले आहेत. त्याची सध्या नितांत गरज आहे."-चंद्रकांत भंडारी, समन्वयक, केसीई सोसायटी

"शाळेत होत असलेले अध्ययन-अध्यापन आणि त्यावर आधारित उजळणी म्हणून घरी दिलेला अभ्यास गृहपाठ असेल, तर विद्यार्थ्यांसाठी तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मात्र, अभ्यासाशी पूरक असणारे विविध उपक्रम, प्रकल्प, रेखाटन, फक्त भरपूर लेखन, अशाप्रकारचा गृहपाठ विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक बनतो आणि पालकांनाही हा गृहपाठ नकोसा वाटतो. अशाप्रकारचा गृहपाठ उन्हाळी व दिवाळी सुट्ट्यांमध्ये देण्यास हरकत नाही."
-डॉ. जगदीश पाटील, सदस्य, मराठी भाषा अभ्यास मंडळ

Homework
Success Story : सोनगीरची पहिली कन्या चैतन्या पाटीलची नर्सिंग ऑफिसर पदाला गवसणी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()