Sakal Exclusive : शरीर, मनस्वास्थ्यासाठी अभ्यासासोबत मैदानी खेळ हवेच! तज्ज्ञांचे मत...

Sakal Exclusive : शरीर, मनस्वास्थ्यासाठी अभ्यासासोबत मैदानी खेळ हवेच! तज्ज्ञांचे मत...
esakal
Updated on

Sakal Exclusive : नवीन शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. मुलांच्या प्रगतीत पालकांचा खूप मोठा हातभार असतो. बालवयात मुलांवर अभ्यास व अपेक्षांचे ओझे न लादता त्यांच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवावा.

शाळांमध्येही शारीरिक शिक्षण विषय असतो, पण तो केवळ कागदावरच राहू लागल्याचे चित्र आहे. मैदानी खेळांमुळे मुलांचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य टिकून राहते, याचा विसर शाळांना पडायला नको. रोज किमान एक तास मुलांसाठी मैदानी खेळ हवाच, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अनेक मुलांना शाळा किंवा पुढील वर्गात जाण्याची भीती वाटते. अशावेळी पालक व शिक्षकांनी त्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी केवळ पुस्तकी अभ्यासापेक्षाही विविध उपक्रम, स्पर्धांचे आयोजन करायला हवे. (Expert opinion Outdoor games are must along with studies for body and mind health of children jalgaon news)

टीव्ही, मोबाईलचा अतिवापर टाळावा

कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने अनेक मुलांना मोबाईल, टीव्हीची सवय लागली. त्यामुळे नेत्रविकार व पाठदुखीचा त्रास वाढल्याची स्थिती आहे. मैदानी खेळांचा विसर पडल्याने लठ्ठपणाही वाढला आहे.

पालकांनी घरी मोबाईलचा वापर कमी करून मुलांसोबत वेळ घालवावा. जेणेकरून पाल्याची मोबाईल, टीव्हीची सवय कमी होईल. ते मैदानी खेळ तसेच अभ्यासाकडे लक्ष देऊ शकतील.

मुलांकडून होमवर्क रोज करा

आपला मुलगा इतर मुलांपेक्षा हुशार असावा, अशी पालकांची अपेक्षा असते. मात्र, इतर मुलांचे पालक त्यांच्या मुलांकडे वैयक्तिक लक्ष देतात. काही जण ट्यूशन लावतात. मुलांना शाळेत शिकताना पडलेले प्रश्न, न समजलेला विषय पुन्हा घरी शिकवतात.

या बाबींकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. आपला पाल्य शाळेत काय शिकला? वर्गात शिकवलेले सगळे त्याला समजले का? अभ्यासात, शाळेत काही अडचणी आहेत का, याबाबत रोज लक्ष द्यावे. त्यातून त्याच्या मनातील शंका, प्रश्न दूर होतील. दुसऱ्या दिवसापासून अभ्यासाकडे त्याचे लक्ष राहील. तो अभ्यासात हुशार होऊ शकतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sakal Exclusive : शरीर, मनस्वास्थ्यासाठी अभ्यासासोबत मैदानी खेळ हवेच! तज्ज्ञांचे मत...
Childrens Diet : गॅरेंटी देतो, हे पदार्थ खाऊन मुलांची बुद्धी होणार तल्लख!

रोज एक तास मैदानी खेळ हवा

मोबाईल, टीव्हीच्या युगात मुले मैदानी खेळ विसरल्याची स्थिती आहे. मुलांचा आवडता छंद मोबईल व टीव्ही पाहणे हाच आहे. त्यांना आवडता खेळ कोणता, असे विचारले असता, अनेकांचे उत्तर मोबाईलमधील व्हिडिओ गेम पाहणे, असे येते. हा प्रकार मुलांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी खूप घातक आहे. पालकांनी मुलांचा रोज किमान एक तास मैदानी खेळ घ्यावा.

मुलांच्या आहार, झोपेकडे लक्ष द्या

मुलांच्या तंदुरुस्तीसाठी कार्बोहायर्टेट, प्रोटीन, विटॅमिन, मिनरल्स, फ्याट व लोह या बाबी खूप महत्त्वपूर्ण आहेत. धान्यातून कार्बोहायटेट, डाळीतून प्रोटिन, विटॅमिन व मिनरल्स हे भाजीपाला व फळांतून, फ्याट पनीर, दुधातून मिळते.

पाणी भरपूर प्यायला हवे. मुलांच्या आहारात रोज मोड आलेले कडधान्य हवेत. फास्ट व जंकफूड द्यायलाच नको. मुलांचा चहा वर्ज्य करावा. त्याचा पोषण आहार असावा. रात्री किमान दहाला तो झोपायला हवा, असे नियोजन हवे.

Sakal Exclusive : शरीर, मनस्वास्थ्यासाठी अभ्यासासोबत मैदानी खेळ हवेच! तज्ज्ञांचे मत...
Stomach Worms in Children : घरगुती उपायांनीही मुलांच्या पोटातील जंत घालवता येतात? कसं ते वाचा!

ब्रह्ममुहूर्तावर मुलांना उठवावे

आयुर्वेदात ब्रह्ममुहूर्ताला खूप महत्त्व आहे. सूर्योदयापूर्वीचे ४५ मिनिट ते सूर्योदयापर्यंत, असा हा मुहूर्त मानला जातो. पहाटे चार ते सकाळी सहा या वेळेत मुले उठली आणि त्या वेळी केलेला अभ्यास, कृती शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने मोलाची मानली जाते. त्या वेळी हवा शुद्ध असते. वातावरण शांत असते. त्या वेळेत सकारात्मक ऊर्जा मिळते. या मुहूर्तावेळी केलेला अभ्यास सहजपणे स्मरणात राहतो, असे तज्ज्ञ सांगतात.

"मुलासोबत सुसंवाद साधत, पाल्यांना स्क्रीनचा अतिवापर टाळण्यास सांगावे. मैदानी खेळ, सकाळचा व्यायाम, वाचनाची आवड, होमवर्क, प्रात्यक्षिके व उपक्रमांतून शिक्षण, मुलांचा आहार व झोप या बाबींकडे पालकांनी लक्ष दिल्यास निश्‍चितच मुलांच्या अडचणी दूर होतील. ब्रह्ममुहूर्ताचे पालन करावे. यातून मुलांची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती वाढेल." -डॉ. अभिजित अहिरे, अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय

Sakal Exclusive : शरीर, मनस्वास्थ्यासाठी अभ्यासासोबत मैदानी खेळ हवेच! तज्ज्ञांचे मत...
Children Diet : लहान मुलांच्या आहारात हे ३ महत्त्वपूर्ण घटक आवश्यक! जाणून घ्या कोणते?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.