एरंडोल : राज्य शासनाने गरीब कुटुंबातील अंत्योदय व बीपीएल लाभार्थ्यांसाठी दिवाळीनिमित्त सुरू केलेला ‘आनंदाचा शिधा’ हा उपक्रम गरिबांची दिवाळी गोड करणारा असून, रेशन दुकानदारांनी पात्र असलेल्या शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत किट पोचवावे, असे आवाहन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.
‘आनंदाचा शिधा’ किट वाटपाचा प्रारंभ आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते झाला. गांधीपुरा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत किट वाटपाचा प्रारंभ करण्यात आला.
या वेळी आमदार पाटील यांनी ‘आनंदाचा शिधा’ या उपक्रमामुळे गरीब जनतेला मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले. तसेच किटवाटपात कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता पुरवठा विभागाने घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.(Extend benefit of Anandacha Shidha to last beneficiary Jalgaon News)
या वेळी आमदार पाटील यांनी तालुक्यात अंत्योदय व बीपीएलधारक लाभार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध झालेले किट याबाबत माहिती जाणून घेतली. आमदार पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना किटचे वाटप करण्यात आले.
प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार सुचिता चव्हाण, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, युवासेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, संस्थेचे अध्यक्ष मदनलाल भावसार, चिंतामण पाटील, विठ्ठल आंधळे यांच्यासह पदाधीधिकारी व लाभार्थी उपस्थित होते. पुरवठा निरीक्षक संदीप निळे, अव्वल कारकून भाऊसाहेब वाघ यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.