Jalgaon District News : जिल्हा रुग्णालयात व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात जानेवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यात ‘एमआयआर’ ची सुविधा सुरू होणार आहे. जिल्हा रुग्णालय आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी ही माहिती ‘सकाळ’ ला दिली. ‘किडनी स्टोन’वर लेझरद्वारे शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध होणार आहे.
जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना सर्व अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे गेल्यावर्षभरात रुग्णालयात येऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. (Facility of MRI in District Hospital in January jalgaon news)
नेत्ररोग, दंतरोग तपासणी व उपचार, दातांची कवळी बसविणे, अपघातात हाड ‘फ्रॅक्चर’ झाल्यावरील उपचार, विविध प्रकारचे पोटाचे विकार, हृदयरोगाचे प्राथमिक उपचार, कर्करोगावरील प्राथमिक उपचार, महिलांची आरोग्य तपासणी व प्रसूती, थायरॉईड, किडनीचे विकार, रक्त तपासणी, लहान मुलांची व आजारांवरील उपचार जिल्हा रूग्णालयात अल्पदरात होतात. सर्वसामान्य रुग्णांना खासगी वैद्यकीय सेवेला हजारो रुपये मोजावे लागतात. त्या सुविधा इथे अल्पदरात मिळत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
रुग्णाच्या मेंदू व संपूर्ण शरीरातील छोट्या अवयवांच्या स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी ‘एमआरआय’ची महागडी सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध होईल.
आरोग्य विभागाकडे ‘एमआरआय’ची मागणी करण्यात आली आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच ते मशिन येऊन रुग्णांना सुविधा मिळेल, असेही डॉ. ठाकूर यांनी सांगितले. खासगी रुग्णालयात सर्वसामान्यांना ‘एमआयआर’साठी अडीच ते आठ हजार रुपये मोजावे लागत होते. ती सुविधा अल्पदरात उपलब्ध होईल.
जानेवारीमध्ये शस्त्रक्रिया सुरु
‘किडनी स्टोन’वर आता लेझर किरणांद्वारे शस्त्रक्रिया रुग्णालयात जानेवारीत सुरू होईल. त्यामुळे किडनी, युरीन स्टोनच्या रुग्णांना फायदा होणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक प्रकारचे पंधरा खाटांचे ‘आयसीयू’ तयार करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.