Hawkers Zone : शहरातील ‘हॉकर्स’ना आपले व्यवसाय करून चरितार्थ भागविण्यासाठी महापालिकेतर्फे जागा दिली जाते. हा भाग ‘हाकर्स झोन’ म्हणून जाहीर केला जातो. त्यामुळे रहदारीस अडथळाही होत नाही व व्यवसायिकांना जागाही उपलब्ध होते.
राज्यात सर्वच महापालिकेत असे झोन आहेत. जळगाव महापालिकेने अशा झोनची तयारी केली होती. मात्र, अधिकारी बदलल्यानंतर ते थंड बस्त्यात पडले आहे. (failure of Municipal Corporation to make hawkers zone problem of encroachment in city jalgaon news)
जळगाव महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांनी शहरातील रस्त्यावरील विक्रेत्यांना हॉकर्स झोन आखून दिले होते. ते झोन जाहीरही केले होते. त्याबाबत कार्यवाही करण्याचे काम तत्कालीन उपायुक्तांना दिले होते. त्यांनीही कारवाई सुरू केली होती. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर कार्यवाही झालीच नाही. पुढे नवीन अधिकारी आल्यानंतर त्याचा विचारही झाला नाही.
महापालिकेमुळेच समस्या वाढल्या
महापालिकेने शहरात ‘हाकर्स झोन’ न केल्यामुळे शहरात अतिक्रमणाची गंभीर समस्या झाली आहे. फुले मार्केट, तसेच शहरातील इतर भागांतही अतिक्रमण वाढले आहे. फुले मार्केटमधील अक्रिमणाबाबत तत्कालीन आयुक्तांनी जागा सूचवून अतिक्रमण पूर्णपणे हटविले होते.
मात्र, त्यानंतरही नवीन आलेल्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत विचार केला नाही. त्यामुळे फुले मार्केट शहरातील इतर भागांतही अतिक्रमण वाढले आहे. फुले मार्केटची समस्या गंभीर झाली आहे. त्या ठिकाणच्या हॉकर्सना जागा देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
हॉकर्स झोन होणार कधी
महापालिकेतर्फे शहरात ‘हॉकर्स झोन’ व ‘नो हाकर्स झोन’बाबत निर्णय घेण्याची गरज आहे. शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवून ‘हॉकर्स’ना त्यांची हक्काची जागा देऊन त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मागे आखलेल्या ‘हॉकर्स झोन’ची माहिती घेऊन कार्यवाही करण्याची गरज आहे.
"शहरातील ‘हॉकर्स झोन’ निर्माण करून त्या ठिकाणी रस्त्यावरील विक्रेत्यांना जागा द्यावी, तसेच फुले मार्केटमधील हॉकर्सना त्याच परिसरात पर्यायी जागा देऊनही त्यांचाही प्रश्न सुटणार नाही. आयुक्तांनी याबाबत लक्ष देऊन सकारात्मकता दाखवावी." -नीलेश पाटील, जिल्हाप्रमुख शिवसेना (शिंदे गट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.