जळगाव : बनावट RT-PCR रिपोर्ट प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखलचे आदेश

fake corona report
fake corona reportesakal
Updated on

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोरोनाच्या आरटी-पीसीआर (Corona RT-PCR test) अहवाल गैरव्यवहार प्रकरणी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी गठीत केलेल्या समितीचा अहवाल सकाळी सादर झाला. या अहवालाच्या सूचनेप्रमाणे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

जिल्हा रुग्णालयात बोगस आरटी-पीसीआर अहवाल मिळण्याच्या आरोपावरून अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी शल्यचिकित्सा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत देवरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, डॉ. संदीप पटेल यांच्या सदस्यत्वाखालील समिती नेमली होती.

fake corona report
महापालिका प्रशासनाचे बदल्यांमागील ‘राज’ अन् ‘कारण’!

दोघे एकमेकांचे नातेवाईक

या समितीने तीन दिवस सखोल चौकशी करून निष्पक्ष अहवाल तयार केला. एकूण ३८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले. अहवाल शनिवारी (ता. ५) अधिष्ठाता डॉ. रामानंद यांना सादर केला. त्यानुसार अहवाल वाचून अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दोषी सुरक्षारक्षक राजेंद्र दुर्गे आणि डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्नील पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांना दिले आहेत. सुरक्षारक्षक दुर्गे व डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्नील पाटील यांनी गैरव्यवहार केल्याचे लेखी मान्य केले असल्याची माहिती डॉ. रामानंद यांनी दिली. या प्रकरणात शिक्का व सही बनावट आढळले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, असेही डॉ. रामानंद यांनी सांगितले. दुर्गे व स्वप्नील पाटील हे एकमेकांचे नातेवाईक आहे.

fake corona report
जळगाव जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटतेय

दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीदेखील बनावट आरटी-पीसीआर अहवाल प्रकरणी समिती नेमली आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक यांची समिती नेमली आहे. या समितीनेही शनिवारी सकाळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांची भेट घेऊन संबंधित अधिष्ठाता यांनी नेमलेल्या समितीशी चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.