Cyber Crime : वीजबिल अपडेट करण्याच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक

cyber crime
cyber crimeesakal
Updated on

जळगाव : वीजबिल अपडेट करण्याच्या नावाखाली रेल्वे कॉलनीमध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त वृद्धाला सायबर ठगाने एक लाख ७५ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (false update electricity bill retired old man was duped cyber thugs Rs 1 lakh 75 thousand online jalgaon news)

रेल्वे कॉलनी येथे गोविंद ईश्वरदास पाराशर हे कुटुंबासह वास्तव्यास असून, २०१५ मध्ये तापी पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. गुरुवारी (ता. १९) त्यांना दुपारी एक अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल आला.

‘तुमचे वीजबिल भरलेले आहे; पण ते अपडेट झालेले नाही. तुम्हाला लिंक पाठविली जाईल. नंतर ॲप डाउनलोड करावे’, असे कॉलवरील व्यक्तीने पाराशर यांना सांगितले.

त्याप्रमाणे त्यांनी ॲप डाउनलोड केले. मात्र, काही वेळानंतर त्यांना बँक खात्यातून २५ हजार रुपये कपात झाल्याचा एसएमएस प्राप्त झाला.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

cyber crime
Jalgaon News : बायकोच्या मैत्रिणीलाच लग्नासाठी Blackmailing

त्यांनी लागलीच बँकेत जाऊन विचारपूस केल्यावर नेट बँकिंगद्वारे कुणीतरी एक लाख ७५ हजार रुपये वळते करून घेतले असल्याचे समोर आले. अखेर शुक्रवारी पाराशर यांनी जिल्हापेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

cyber crime
Jalgaon Crime News : पोलिसांनी पकडली वाळूची चोरटी वाहतूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.