Family Day Special : सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या युगात सलग चार पिढ्या गुण्यागोविंदाने एकत्र नांदण्याचा आदर्श येथील डेंबाणी कुटुंबाने निर्माण केला आहे. कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर व्यावसायिक प्रगती साधणाऱ्या डेंबाणी कुटुंबीयांचे आज कुटुंबप्रमुख म्हणून भूमिका बजावणाऱ्या हुंदराम डेंबानी यांचा शब्द घरातील सर्व जण आजही प्रमाण मानतात.
त्यामुळे या कुटुंबीयांकडे पाहिल्यानंतर चार पिढ्यांपासून खऱ्या अर्थाने ‘हम साथ साथ है’ची प्रचीती आल्याशिवाय राहत नाही. (Family Day Special Hum Saath Saath Hai from 4 Generations ideal created by Ambani family of Chalisgaon jalgaon news)
मूळ सिंध प्रांतातील लारकाना येथील चिमनदास डेंबाणी १९४९ मध्ये सुरवातीला देवळाली कॅम्प येथे आले. १९६२ मध्ये त्यांनी चाळीसगावला ‘प्रकाश इलेक्ट्रॉनिक्स’ नावाचे दुकान सुरू केले. चिमनदास डेंबाणी यांना चोइथराम, जोधाराम, हुंदराज, जयराम, हरेश व सुरेश, अशी सहा व चार मुली. आपल्या सहाही मुलांना चिमनदास डेंबाणी यांनी व्यवसायात पारंगत केले.
कुटुंबाचा विस्तार, तरी एकत्र
सचोटीच्या जोरावर त्यांनी अल्पावधीतच व्यवसायात भरारी घेतली. कालांतराने एकेका मुलाचे लग्न होत गेल्यानंतर कुटुंबात सदस्यांची संख्याही वाढत गेली. मात्र, एकाही मुलाने किंवा सुनेने कुटुंबापासून वेगळे राहण्याचा विचार मनात आणला नाही.
चिमनदास डेंबाणी यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी म्हणजे २००१ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांचा दोन नंबरचा मुलगा जोधाराम डेंबाणी यांच्याकडे कुटुंबप्रमुखाची जबाबदारी आली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जोधाराम डेंबाणी यांनीही कुटुंबात सर्वांना एकत्रित ठेवले.
राम आणि श्याम या आपल्या दोन मुलांसह चार भावांच्या मुलांमध्ये जोधाराम डेंबाणी यांनी कधीही भेदभाव केला नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
उच्च शिक्षणावर भर
ग्राहकांचा विश्वास संपादन करीत एकीकडे व्यवसायाला भरभराटी प्राप्त करून देत असताना, डेंबाणी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाकडेही त्यांनी तितकेच लक्ष दिले. त्यामुळे आज या कुटुंबातील दोन मुली डॉक्टर असून, मुलांमध्ये कोणी सिव्हिल इंजिनिअर, तर कोणी चार्टर्ड अकांउटंट आहेत.
जोधाराम डेंबाणी यांचे ७ एप्रिल २००८ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांचे भाऊ हुंदराज डेंबाणी यांच्याकडे कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी आली. तेही तितक्याच जबाबदारीने ही धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.
सुशिक्षित असलेल्या डेंबाणी कुटुंबीयांनी धार्मिकतेचा वसाही जपला आहे. आजही सर्व कुटुंबीय रोज वीस मिनिटे सुधांशू महाराजांचा सत्संग एकत्रित बसून ऐकतात. डेंबाणी कुटुंबातील मुली आजही आपल्या माहेरी चाळीसगावला मुलाबाळांसह आल्यानंतर घरात एकूण ७१ जण जमतात. विविध सण, उत्सवाला हे सर्व आजही एकत्र येतात.
स्वयंपाकाचे आठवड्याचे वेळापत्रक
घरात रोज नाश्त्यासह जेवणाला काय काय करायचे, याचे नियोजन राम डेंबाणी यांच्या मातोश्री वीणा डेंबाणी पाहतात. त्यांचे वय सद्यःस्थितीत ७१ असतानाही त्या आपल्या चार देराणी व सहा सुनांसोबत अगदी व्यवस्थितपणे स्वयंपाकाचे नियोजन करतात.
सोमवार ते रविवार घरातील सर्वांचा रोजचा नाश्ता ठरलेला असतो. विशेष म्हणजे वीणा डेंबाणी यांनी एकदा स्वयंपाकात काय करायचे, हे निश्चित केल्यानंतर त्यांची एकही देराणी किंवा त्यांची कुठलीच सून त्याला नकार देत नाही.
ना भांडण, ना कधी वाद
घरातील भांडणाबाबत ‘घरोघरी मातीच्या चुली’, अशी म्हण आहे. मात्र, डेंबाणी कुटुंबीय त्याला अपवाद आहे. त्यांच्या कुटुंबात आजपर्यंत कधीही कुठलेही भांडण किंवा वाद विकोपाला गेलेला नाही.
सर्व जण एकमेकांना समजून घेत असल्याने व घरातील वडिलधाऱ्यांचा मान, सन्मान राखत असल्याने भाऊ-भाऊ, सासू-सुना किंवा देराणी-जेठाणी, अशा कोणामध्येही कुठलेही वाद आजपर्यंत झालेले नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.