ST Bus Fare : 'परिवहन'ने ठरविलेले भाडे ‘खासगी’हून अधिक; प्रवाशांच्या लुटीची हमी!

ST Bus News
ST Bus Newsesakal
Updated on

Jalgaon News : गर्दीच्या हंगामात खासगी ट्रॅव्हल्सकडून जादा प्रवासी भाडे आकारण्याबाबत तक्रारी येत असतात.

या पाश्‍र्वभूमीवर परिवहन विभागाने खासगी वाहतुकदारांसाठी ठरवून दिलेले भाडे सध्याच्या ट्रॅव्हल्स दरापेक्षा कितीतरी अधिक आहे. म्हणजे परिवहन विभागानेच आता खासगी ट्रॅव्हल्सचालकांना जादा भाडे आकारणीचा ‘परवाना’ देऊन टाकल्याचे दिसून येते. (Fares fixed by msrtc are higher than Private bus jalgaon news)

गर्दीच्या हंगामात मागणी व पुरवठा यामधील तफावतीमुळे मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, या उद्देशाने कमाल भाडे निश्चित केले आहे.

राज्यातील खासगी कंत्राटी प्रवासी वाहनांचे कमाल भाडेदर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वाहनांचे संपूर्ण बससाठी प्रतिकिलोमीटर भाडेदर त्याच स्वरूपाच्या येणाऱ्या भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर गृह विभागाने २७ एप्रिल २०१८ अन्वये निश्चित केले आहे.

पुणे, मुंबई, नागपूरसह अमदाबादकडे गाड्या

जळगाव शहरासह जिल्ह्यातून खासगी बसेस प्रामुख्याने पुणे, मुंबई, नागपूर, सुरत, अहमदाबाद या ठिकाणी ये-जा करीत असतात. परिवहन कार्यालयाने खासगी ट्रॅव्हल्समालकांना प्रवाशांकडून किती भाडे आकारावे, याचा तक्ता तयार करून दिला असून, प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयात याचा फलक लावण्याची सूचनाही दिली आहे.

गर्दीच्या हंगामात तपासणी मोहीम

कमाल भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बसची तपासणीची विशेष मोहीम १६ मे ते ३० जून या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ST Bus News
New Sand Policy : ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने नवे वाळू धोरण संकटात

प्रतिकिलोमीटर दर असे

खाजगी ट्रॅव्हल्स यांनी शासन निर्णयानुसार आकारावयाचे महत्तम प्रतिप्रवासी, प्रतिकिलोमीटर दर-नॉन एसी सिटर (निमआराम)-२.५६ रुपये, एसी सिटर-४.६२ रुपये, नॉन एसी स्लिपर-२.९५ रुपये, एसी स्लिपर-५.४९ रुपये असे आहेत.

‘नॉन-एसी’ला परवानगीच नाही

विशेष म्हणजे परिवहन विभागाने हे दर ठरवून देताना सीटर (निमआराम), एसी, नॉन-एसी अशाप्रकाराचा उल्लेख केला आहे. मुळात, महाराष्ट्रात खासगी ट्रॅव्हल्सला नॉन-एसी वाहने चालविण्याची परवानगीच नाही, अशी माहिती खासगी ट्रॅव्हल्स संघटनेचे अध्यक्ष मुकेश बेदमुथा यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

ठरवून दिलेले दर लुटीचा परवाना

या दरानुसार पुणे, मुंबई, नागपूर अथवा सुरत, अमदाबाद याठिकाणचे दर ठरविल्यास ते सध्या खासगी ट्रॅव्हल्सचालक आकारत असलेल्या दरापेक्षा अधिक होतात. त्यामुळे हे दर ठरवून परिवहन विभागाने प्रवाशांच्या लुटीचा परवानाच दिल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्‍याम लोही यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

ST Bus News
Crop Loan : पीककर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड; बँकेचे काम कासवगतीने

याठिकाणी करा तक्रार

कोणत्याही खासगी वाहतुकदाराने (खासगी ट्रॅव्हल्स) कंपनीने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जादाभाडे आकारणी केल्यास त्याची तक्रार dyrto.19-mh@gov.in व dycommr.enf2@gmail.com या संकेतस्थळावर करावी, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्‍याम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

अशी आहे दराची तफावत

ठिकाण----------परिवहनने ठरवलेले---सध्याचे प्रचलित

पुणे (एसी स्लीपर)---२१४१------१२००-१४००

मुंबई (एसी स्लीपर)----२३६१-----१०००-१२००

इंदूर (एसी स्लीपर)------१७०२-----८००-१०००

अहमदाबाद (एसी स्लीपर)--३१८४---१४००-१७००

"खासगी ट्रॅव्हल्सचालक आकारत असलेले दर अत्यंत वाजवी आणि योग्य आहेत. गर्दीच्या हंगामात काहीवेळा दरवाढ केली जाते. मात्र, परिवहन विभागाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमीच आहेत. त्यामुळे तक्रारीचा प्रश्‍नच नाही." -मुकेश बेदमुथा, अध्यक्ष, खासगी ट्रॅव्हल्स संघटना

ST Bus News
Cotton Rate Crisis : कापूस उत्पादक संकटांच्या चक्रव्यूहात; सरकार फिरतेय खुर्चीभोवती गोल...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()