Indore Bus Accident | ...अन्‌ तो फोन ठरला अखेरचा!

‘काळजी करू नकोस, मी इंदूरहून निघालो आहे. दोन तासांत अमळनेरला पोहोचतोच’, असा निरोप दिला अन् तो फोन ठरला अखेरचा!
Indore bus accident
Indore bus accidentesakal
Updated on

अमळनेर (जि. जळगाव) : ‘काळजी करू नकोस, मी इंदूरहून निघालो आहे. दोन तासांत अमळनेरला पोहोचतोच’, असा निरोप अपघातग्रस्त बसमधील निंबाजी आनंदा पवार (वय ६०, रा. पिळोदे, ता. अमळनेर) यांनी अपघाताच्या दहा मिनिटापूर्वी आपली पत्नी कमलबाई पवार यांना दिला होता. मात्र, काही तासांतच त्यांचा मृतदेह पिळोदे या गावी पोचला. या घटनेने गावात अनेकांच्या घरी चुली पेटल्या नव्हता. (Latest Marathi News)

निंबाजी पवार अनेक वर्षांपासून शेतीवर आपला उदरनिर्वाह करीत होते. त्यांना मोठे चिरंजीव नरेश पवार शेतीकामात मदत करायचे. लहान चिरंजीव सुदेश पवार पालघरला शिक्षक आहेत. दोन नंबरचे चिरंजीव ज्ञानेश पवार इंदूर येथील प्रीतमपूर कंपनीत कामाला आहेत. महिन्यात, दोन महिन्यांत ते नेहमी आपल्या पत्नीसमवेत इंदूर येथे जात असे. या वेळेसही ते पत्नी कमलबाई पवार यांना घेऊन जाणार होते. मात्र, कमलबाई यांची तब्येत बरी नसल्यामुळे निंबाजी पवार रविवारी (ता. १७) अपघातग्रस्त बसनेच अमळनेर येथून गेले होते.

Indore bus accident
Indore Bus Accident : नवस फेडला, तरी देव रुसला!

रात्रभर आपला मुलगा सून व नातवंडे यांच्यासमवेत गप्पागोष्टी केल्या आणि शेवटी याच गप्पागोष्टी त्यांच्या जीवनातील अखेरचे आनंदाचे क्षण ठरले. सकाळी अपघातग्रस्त बसने ज्ञानेश पवार यांनी वडील निंबाजी पवार यांना महू (मध्य प्रदेश) येथून त्या बसमध्ये बसविले. त्यांनी अखेरचेच केलेले ‘बाय-बाय’ हे जणू काही जीवनाला ‘बाय बाय’ करण्याचे संकेत क्रूरनीतीने दिले. घटनेपूर्वी अर्धा तास अगोदर बसचालकांनी ती बस मधुबन या हॉटेलजवळ थांबवली होती. तेथूनच निंबाजी पवार यांनी आपल्या पत्नीस फोन करून दोन तासांत येत असल्याचे कळविले. चहा व नाश्ता झाल्यानंतर बस मार्गस्थ झाली, अन्‌ काही मिनिटांतच ‘होत्याचे नव्हते झाले’. त्या बसला नर्मदा नदीत जलसमाधी मिळाली. यात निंबाजी पवार यांचा मृतदेह हाती लागला.

सुरवातीला निंबाजी पवार यांच्या खिश्यात कमलाबाई पवार यांचेही आधार कार्ड असल्यामुळे अनोळखी मृतदेह कमलाबाई पवार यांचाच असल्याचा समज स्थानिक प्रशासनाने केला अन्‌ त्यांनी दोन्ही पती-पत्नी यांचे मृतांच्या यादीत नाव समाविष्ट केले. जेव्हा ही बातमी वाऱ्यासारखी अमळनेर तालुक्यात पसरली, तेव्हा अनेकांच्या पायाखालची वाळू घसरली. काही तासांनंतर कमलाबाई घरी सुखरूप असल्याचे समजले. तेव्हा काहींना हायसे वाटले.

Indore bus accident
कर्जबाजारी शेतकऱ्याने शेतातच घेतला गळफास

मात्र, निंबाजी पवार यांची मृतांची बातमी ही खोटी ठरो, अशा भ्रामक अपेक्षात होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत निंबाजी पवार यांचा मृतदेह पिळोदे येथे पोचल्यावर कुटुंबियाने एकच आक्रोश केला. रात्री उशिरापर्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी मनीषा पाटील, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.