Jalgaon News : हिवरखेड्यात शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

yogesh patil
yogesh patil esakal
Updated on

Jalgaon News : शेतातील वायर जोडत असताना विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (ता. ३) दुपारी दोनच्या सुमारास हिवरखेडा (ता. जामनेर) शिवारात घडली.(Farmer dies due to electric shock in Hiwarkheda jalgaon news)

योगेश अशोक पाटील (वय २४) नेहमीप्रमाणे आपल्या गावालगतच्या केळीच्या शेतात गेले असताना, त्यांना वायर तुटलेली आढळली. तुटलेली वायर जोडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना विजेचा जबरदस्त धक्का बसल्याने त्यांनी जोरात किंकाळी ठोकली अन् ते जमिनीवर कोसळले.

त्यांच्या त्या आवाजाने बाजूलाच क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी या घटनेची माहिती गावातील लोकांना दिली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत, योगेश यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नजमुद्दीन तडवी यांनी उपचाराअंती त्यांना मृत घोषित केले. परिचारिका योगिता नागरे-पाटील, ललित केवट व सहकाऱ्यांनी उपचारादरम्यान सहकार्य केले.

yogesh patil
Jalgaon News : दिव्यांगांना 125 इलेक्ट्रिक तीनचाकी सायकलींचे वाटप

शेतातून आलाच नाही

अवकाळी पावसाने सध्या शेत शिवारातील कामे तशी बंद आहेत. परंतु शेताकडे जाऊन येतो, असे योगेश आपल्या आई-वडिलांना सांगून घरून सांगून निघाला. मात्र शेतातील तुटलेली वायर जोडण्याच्या प्रयत्नात त्याच्या जीवनाची तारा तुटली.

शेतकरी अशोक रामचंद्र पाटील यांचा योगेश हा एकुलता एक मुलगा होय. योगेश शेतात काबाडकष्ट करून केळीचे उत्पन्न घ्यायचा. सुस्वभावी आणि मनमिळाऊ असलेल्या योगेशच्या अकाली जाण्याने हिवरी-हिवरखेडा परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

yogesh patil
Jalgaon News : अंजनगाव सुर्जी नागरी बँकेचे जळगाव पीपल्समध्ये विलीनीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.