डिझेलटंचाई अन् भाववाढीने बळीराजा संकटात; मजूरही मिळेना

उन्हाळी हंगामासाठी शेतात नांगरणीसह इतर मशागतीसाठी बळीराजाची लगबग सुरू झाली आहे.
Farmers crisis
Farmers crisisesakal
Updated on

भुसावळ (जि. जळगाव) : उन्हाळी हंगामासाठी शेतात नांगरणीसह इतर मशागतीसाठी बळीराजाची लगबग सुरू झाली आहे. मात्र, डिझेल दरवाढीचा फटका सरळ शेतीच्या मशागतीला बसला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, ‘दुष्काळात तेरावा महिना’, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. कारण शेतीमालाचे दर गेल्या कित्येक महिन्यांपासून स्थिर आहेत. मात्र, महागाई वाढतच असल्याचे दिसून येते.

सद्यःस्थितीत नांगरटी करण्यात शेतकरी व्यस्त आहे. बैलांऐवजी सध्या जवळपास ९० टक्के शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करून मशागत करतात. गेल्या वर्षी हजार-बाराशे रुपये असलेला ट्रॅक्टरच्या एकरी नांगरणीचा दर यंदा दोनशे-तीनशे रुपये महागला आहे. निसर्गाच्या विविध अरिष्टांसोबत डिझेल दरवाढीचा फटकाही बसत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. जास्तीचे दर देऊनही ट्रॅक्टर, बैलजोडी वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची कामे खोळंबली आहेत. मशागतीच्या कामांची मजुरी वाढल्याने शेतकरी चारही बाजूंनी भाववाढीने घेरला गेला आहे.

पैसे देऊनही ट्रॅक्टरचालक वेळेवर येईना

शेतकऱ्याला मशागतीसाठी ट्रॅक्टरचालकांची वाट पाहावी लागत आहे. तो वेळ देईल. त्यावेळेस आपल्या शेतीकामे त्यांच्याकडून करावी लागत आहे. येत्या काही दिवसांत पावसाळ्याला सुरवात होणार आहे. मात्रल गावात ट्रॅक्टरची संख्या मर्यादित असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीकामांसाठी ट्रॅक्टरचालकाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.

नांगरटी सध्याचे दर गेल्या वेळीचे दर

दोन फडी पलटी- १८०० १५००

तीन फाडी पलटी- १३०० १०००

साधे तीन फाडी पलटी- १२०० ८०० ते ९००

सर्वांचेच वाढले दर

-काडीकचरा वेचणाऱ्यांची मजुरी सध्याला १५० रुपये आहे. गेल्या वर्षी १०० रुपये होती

-शेतमजुराचा रोज ३०० रुपये असून, पूर्वी २०० ते २५० रुपये होता

-बैलजोडीने कोळपणी १२०० रुपये आहे, गेल्यावर्षी त्याचे दर ९०० ते १००० रुपये होते

-बैलांसाठी लागणारा चारा २५०० रुपये शेकडा आहे, गेल्यावर्षी तो १५०० रुपये शेकडा होता

-दादरचा चारा (कळबा) ५ हजार रुपये शेकडा असून, गेल्यावर्षी ३ हजार रुपये शेकडा होता

''शेतकऱ्यांनी बैलजोडी राखण्याचे ठरविले, तरी चाऱ्याचे भाव आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे जनावरे सांभाळणे अडचणीचे ठरत आहे. नांगरटी, रोटर यांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.'' - विक्रम पाटील, शेतकरी, शिंदी (ता. भुसावळ).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.