Jalgaon News : मृग नक्षत्रात खरिपाचा पेरा हुकला शेतकरी चिंचेत; पाऊस लांबला

Farmer News
Farmer Newsesakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात मृग नक्षत्रावर खरीप हंगामातील पेरण्या केल्या जातात. मात्र, मृग नक्षत्र सुरू झाले, तरी पेरण्या झालेल्या नाहीत. या वर्षी उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात आहे. पाऊस हुलकावणी देत आहे.

पाऊस नसल्याने मशागती ठप्प आहेत. यामुळे या वर्षीचा मृग नक्षत्रातील खरीपाचा पेरा हुकला आहे. पावसाच्या आगमनानंतर मशागती होऊन पेरण्या होतील. त्यामुळे पेरण्या लांबणीवर पडणार आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. (farmer sows kharif crop in Mrig Nakshatra ending rain latest Jalgaon News)

या वर्षी जूनचा पहिला आठवडा संपला, तरी पावसाचे आगमन नाही. मागील वर्षी जूनमध्ये खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. दरवर्षी उन्हाळ्यात होत असलेल्या पावसामुळे खरीपपूर्व मशागती होत. या वर्षी उन्हाळी पाऊसही झालाच नाही.

मृगावर शेतकरी ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, चवळी, तूर, सुर्यफूल, सोयाबीनची पेरणी करत. सध्या ऊन व ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी शेणखताचे शेतात ढीग मारले आहेत. मशागती खोळंबल्या आहेत.

काही ठिकाणी पाऊस होईल, या आशेवर खरीप पेरणीपूर्व मशागती करताना दिसत आहेत. तालुक्याच्या ठिकाणी कृषी केंद्र ओस पडू लागल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे, खते अद्यापही खरेदी केलेली नाहीत. त्यामुळे कृषी दुकानदार ग्राहकांच्या प्रतिक्षेत आहेत.

Farmer News
Jalgaon News : केळीचे साडेबाराशे हेक्टर क्षेत्रावर नुकसान; तालुक्यात चक्रीवादळाचा तडाखा

शेतकरी पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहेत. पाऊस पडल्यानंतरच खरिपाच्या पेरण्या होणार असून, खरीप हंगाम लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यातील पिके व सरासरी क्षेत्र

पिकाचे नाव सरासरी (हेक्टरमध्ये)

ज्वारी खरीप--३२ हजार

बाजरी--९ हजार

मका--७२ हजार

तूर--१३ हजार ३००

उडीद--२२ हजार १००

मूग--२३ हजार ८००

भुईमूग--२ हजार

सोयाबीन--१८ हजार ३००

कापूस--५ लाख ५० हजार

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Farmer News
Jalgaon Crime News : गाणे बदलविल्याने तरुणावर चाकूने हल्ला

""शेतकऱ्यांनी शंभर मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरण्या करू नयेत. पाऊस पडल्यानंतर त्यात अंतर पडण्याची शक्यता असते. शंभर मिलिमीटर पाऊस झाला, की काही दिवस जमिनीत ओल असल्याने पेरण्या वाया जात नाहीत.""

-संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Farmer News
Priyanka Chopra New Look: प्रियांकाची झलक सगळ्यात अलग! भारत असो वा इटली चर्चा तर होणारच..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.