Jalgaon News : शेतकऱ्यांनी घेतला चारा-पाण्याचा धसका; ‘देवा आता अंत पाहू नको रे बाबा’ची आर्त हाक

farmer
farmer esakal
Updated on

Jalgaon News : मृग नक्षत्र निघून गेले, आद्राही अर्ध संपले, तरी पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी जनावराच्या चारा-पाण्याचा धसका घेतला असून, ‘देवा... आता अंत पाहू नको रे बाबा...’, असे विनवणी शेतकरी करीत आहेत.

खरिपात पेरणीयोग्य पाऊस पडावा, यासाठी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. गेल्या महिन्यापासून पाऊस येण्याविषयी हवामान विभाग अंदाज वर्तवित आहे. मात्र, सर्व अंदाज फोल ठरत असल्याचे चित्र आहे. (farmer waiting for rain for suitable for sowing in Kharif season jalgaon news)

असहय उकाडा...

मृगात मूग, उडीद चांगले येतात, असा शेतकऱ्यांचा अनुभव असल्याने या वर्षी हा पेरा पाऊस लांबल्याने होणार नाही. अद्याप वरुणराजाचे आगमन न झाल्यामुळे खरिपातील पेरण्या खोळंबल्या आहेत.

त्यामुळे दिवस कोरडा जात असून, वातावरणात उष्माचा अनुभव नागरिक घेत आहेत. जनावरांचे चारा-पाण्यासाठी हाल होत आहेत. शेतकरी जनावरांना जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने ठेवलेला कडबा, गवत संपल्याने मोठी अडचण झाली आहे.

पाऊस वेळेवर आला, तर पहिल्यांदा चारा व पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी केली होती. पेरणीयोग्य शेती तयार करून शेतकरी पावसाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. पैशाची जुळवाजुळव करून, अनेकांनी सावकाराकडून तजवीज करून बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी करून घरात आणून ठेवली आहेत. पाहता पाहता जून गेला, जुलै सुरू झाला, तरी आलेला दिवस कोरडा जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

farmer
Sharad Pawar In Jalgaon : अजितदादांच्या बंडानंतर पवार या तारखेला जिल्ह्यात

मृगात पेरणीयोग्य पाऊस पडला असता, तर पेरण्या लवकर होऊन उत्पादन चांगले येते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. पाऊस झाल्यास निदान जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होऊन दीड-दोन महिन्यांत नवा चारा येईल, असे शेतकरी सांगत आहेत.

ढगांची उंची ९ हजार मीटर

आकाशात पावसाचे ढग जमा होता. मात्र, पाऊस पडत नाही. असे अनेक दिवसांपासून सुरू आहे. याबाबत हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांना विचारले आले असता, त्यांनी सांगितले, की ‘अल निनो’ वादळामुळे पावसावर मोठा परिणाम झाला आहे. ढगांची विभागणी योग्य नाही. ढग जमा होतात. मात्र, त्यांची घनता कमी असते.

त्यांची उंची जमिनीपासून ९ हजार मीटर उंच असल्याने जोरदार पाऊस पडत नाही. जोरदार पाऊस पडतो, तेव्हा ढग जमिनीपासून किमान २ ते ५ हजार मीटर उंच असतात. हे चित्र बदलत नाही, तोपर्यंत काही ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपात पाऊस पडेल. ८ जुलैपर्यंत काही ठिकाणी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे.

farmer
Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादीत 'बॉस' कोण? कोणत्या गटात कोणता नेता, आज होणार फैसला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.