Jalgaon News : तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांमधील गूळ मध्यम प्रकल्पात शेती गेलेले प्रकल्पग्रस्त शेतकरी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी गेल्या १६ वर्षांपासून प्रदीर्घ लढा देत आहे वेळोवेळी आश्वासन देऊन एवढे दिवस प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेठीस ठेवल्याने शेतकरी संघटनेने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. (Farmers Association along with project affected farmers staged protest at office of Tapi Irrigation Development Corporation jalgaon news)
त्यावेळी कार्यकारी संचालक मंडळाने आश्वासन दिले, की प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मार्च महिना अखेरीस निधी उपलब्ध राहिला तर मी पैसे देईन त्याच्याच पाठपुरावा म्हणून आज परत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात गेले असता संबंधित अधिकाऱ्यांनी जमलेली कार्यालयातील गर्दी बघून तातडीची बैठक लावून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून येत्या पंधरा दिवसात पैसे वर्ग करतो, असा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी तात्पुरते आंदोलन स्थगित केले.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
मात्र येत्या दहा मेपर्यंत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पैसे वर्ग न झाल्यास आधी दिलेल्या निवेदनाप्रमाणे कार्यालयाच्या आवारातील वृक्षांवर गळ्याला फास लावून सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तापी पाटबंधारे विभागाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर रक्कम द्यावी, अशी मागणी करत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. या वेळी शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, सचिन शिंपी, किरण गुजर, सय्यद देशमुख, कमलेश शिंपी, विनोद धनगर, सुरेश पाटील, राहुल धनगर, प्रदीप देसले, अजित पाटील, सचिन धनगर, विजय भालेराव, दीपेश पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.