Market Committee News : बाजार समित्यांमध्ये आता शेतकऱ्यांना उभे राहाता येणार

Election News
Election Newsesakal
Updated on

जळगाव : जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. एप्रिल २०२३ पूर्वी बाजार समित्यांच्या रणधुमाळी पूर्ण होण्याचे संकेत आहेत. बाजार समित्यांच्या निवडणूक नियमावली बदलाबाबत मंत्रालयात प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मतदार नसले तरी उमेदवार म्हणून निवडणूक लढविता येणार आहे.

आगामी आठ दिवसांत मंत्रालयात या प्रस्तावाला व नवीन नियमावलीला मंजुरी मिळेल, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली. बाजार समिती निवडणूक नियमावलीमधील बदलाचा प्रस्ताव पणन संचालनालयाने मंत्रालयात विधी व न्याय विभागाकडे तपासण्यास पाठविला आहे.

Election News
Sangli News : सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बुडवला ८४ कोटी ७८ लाखांचा कर; गुन्हा दाखल

आतापर्यंत लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना निवडणुकीचा खर्चाचा रोज हिशोब ठेवून तो सादर करावा लागत होता. आता मात्र तो नियम बाजार समित्यांनाही लागू होण्याची शक्यता आहे. मंत्रालयात पाठविलेल्या प्रस्तावात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना असणाऱ्या आचारसहिंता आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांना राहणार आहे. बाजार समितीच्या निवडणुकांना यंदा प्रथमच आचारसंहिता लावण्यात येणार आहे. मंत्रालयाच्या मंजुरीनंतरच राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून निवडणुकांची आचारसहिंता निश्चित केली जाईल, अन्यथा नाही.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Election News
New Rules Before Budget : बजेटपूर्वीच देशात 'या' नियमांमध्ये बदल; LPG किमतीबाबत मोठी अपडेट

...या सभासदांचा मतदारयादीत होणार सामावेश

कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था, ग्रामपंचायतीच्या नव्याने निवडून आलेल्या किंवा कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायतींनी व्यवस्थापन समितीचे सदस्य स्वीकृत सभासदांचा अंतिम मतदारयादीत समावेश होणार आहे. बाजार समितीसाठी जुन्या निवडणूक नियमांमध्ये आचारसंहितेची तरतूद नव्हती. नवीन बदलात ती केली आहे. त्याबाबतचा आचारसंहितेचा मसुदा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून निश्चित होणार असल्याचे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले. बाजार समितीच्या निवडणुकीत निवडणूक खर्चाचा हिशेब आता उमेदवारांना द्यावा लागणार असून, खर्चाची मर्यादाही निवडणूक नियमावली अंतिम झाल्यावर निश्‍चित केली जाणार आहे.

शेतकऱ्याचे नाव नसले तरी उमेदवार

मतदारयादीत नाव असलेला मतदारच विकास सोसायट्या, ग्रामपंचायत मतदारसंघातून निवडणुकीस उभा राहातो, अशी जुनी तरतूद होती. नवीन बदलानुसार ७/१२ उताराधारक, २१ वय पूर्ण आणि बाजार समिती क्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांना मतदारयादीत नाव नसले तरी निवडणुकीत उभे राहण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांना सूचक, अनुमोदक मात्र अंतिम मतदारयादीतील राहतील. विकास सोसायटी मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदारसंघातील चार, अशा १५ जागांवर शेतकरी निवडून येण्याची शक्यता आहे. बाजार समिती कायद्यातील बदलाच्या अनुषंगाने निवडणूक नियमावलीत बदल करण्याचा प्रस्ताव आहे.

शेतकऱ्यांची व्याख्या

प्रस्तावित निवडणूक नियमावलीत शेतकऱ्यांची व्याख्या निश्चित केली आहे. मागील पाच वर्षांत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संबंधितांनी तीन वेळा शेतमाल विक्रीस घातला पाहिजे, अशी अट आहे.

Election News
Nashik News : ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर कारवाई; एमजी रोडवर अर्ध्यावर अनधिकृत पार्किंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.