Jalgaon News : शेतकऱ्याच्या कमाईवर आता वीज तारांचा कहर!

Jankiram Patil sitting in the burnt field.
Jankiram Patil sitting in the burnt field. esakal
Updated on

Jalgaon News : कधी आसमानी, तर कधी सुलतानी संकटांत सापडलेल्या शेतकऱ्याला आता शेतातून जाणाऱ्या विद्युत तारांचीही भिती वाटायला लागली आहे. (farmers facing great loss of farm due to short circuits jalgaon news)

वावडद्यात शॉटसर्कीटमुळे उभा ऊस जळून खाक झाला. तर, सावखेड्यात पुर्ण केळी बागेचा कोळसा झाल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी आणि तालूका पोलिसांत अकस्मात आगीची नोंद झाली आहे.

सावखेडा खुर्द (ता. जळगाव) येथे नामदेव यादव पाटील (वय ७०) यांची गट नंबर १५०मध्ये केळीबाग आहे. काढणीवर आलेल्या उभ्या शेतात शुक्रवारी (ता. १२) आग लागली. शेतातून गेलेल्या महावितरणची वीज तार अचानक तुटून शेतात पडल्याने शेतात आग लागून उभ्या केळी पीकाचा कोळसा झाला.

या आगीत शेतकऱ्याच्या एकूण सव्वा दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले. याबाबत श्री. पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आगीची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक बापू पाटील तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jankiram Patil sitting in the burnt field.
Jalgaon Temperature Rise : तापमान ४७ अंश पार...! जळगाव ठरतेय सर्वांत ‘हॉट’

दुसऱ्या घटनेत वावडदा (ता. जळगाव) येथे शनिवारी (ता. १३) दुपारी लागलेल्या आगीत अंदाजे ४ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. वावडदा येथील शेतकरी जानकीराम फकीरा पाटील त्यांच्या शेतात आग लागली. शनिवारी ते शेतात असताना अचानक विद्युत तारांमध्ये शार्कसर्किट होवुन ऊसाला आग लागली.

या आगीत २ एकर ऊस जळून खाक झाला असून, जवळपास चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या संदर्भात अद्याप कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी जानकीराम पाटील यांनी केली आहे.

तर नांद्रा येथे घडलेल्या आणखी एका घटनेत शेत गट क्र ३०१/१/३मध्ये शुक्रवारी (ता. १२) दुपारी तीनला महावितरण कंपनीच्या विद्युतवाहीनी तारा एकमेकांना चिकटल्याने शॉटसर्कीट होवुन मक्याच्या पिकात आग लागली.

आगीत शेतकरी किरण शालीग्राम पाटिल यांच्या मालकीच्या २ लाख रुपये किंमतीच्या मका पिकाचे नुकसान झाले असून, सोबत ठिबक नळ्या जळाल्या आहेत. या प्रकरणी तालूका पोलिसांत अकस्मीक आगीची नोंद करण्यात आली असून, पोलिस नाईक ईश्‍वर लोखंडे तपास करत आहेत.

Jankiram Patil sitting in the burnt field.
Sakal Impact : अखेर विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा विधी पुढे ढकलला.... या तारखेपासुन परीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.