चाळीसगाव (जि. जळगाव) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन बाजार समितीचे प्रशासक तथा तालुका सहाय्यक निबंधक (सहकार विभाग) चंद्रकांत पवार यांनी पत्रकान्वये केले आहे. (Farmers for onion subsidy Apply by April 20 jalgaon news)
पत्रकात म्हटलेले आहे, की २०२२ - २०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.
यासाठी सोमवारी ३ ते २० एप्रिलपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन पणन संचालक यांनी केलेले असून, त्यानुसार राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये व जास्तीत जास्त २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
तरी राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा अनुदान योजना २०२२ -२०२३ चा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत, तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
विक्री केलेल्या कांदाविक्रीची मुळपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला सात/बारा उतारा, बँक पासबुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबीयांच्या नावे आहे, अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथपत्र आवश्यक आहे.
अर्ज चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला आहे. त्यांनी चाळीसगाव बाजार समितीच्या कार्यालयात वरील मुदतीत अर्ज करावा. त्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी असेही शेवटी पत्रकात नमूद केलेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.