Jalgaon News : कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांची फरफट

Incentives will not accrue; Complaint of farmers in Bhadgaon taluka
Incentives will not accrue; Complaint of farmers in Bhadgaon talukaesakal
Updated on

आमडदे (ता. भडगाव) : राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या. यात अनेक नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे नसल्याच्या तक्रारी आहेत. ज्या शेतकऱ्यांची नावे याद्यांमध्ये आहेत. अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा झालेले नाहीत.

तक्रारदार शेतकऱ्यांची नावे पहिल्या यादीत आलेली आहेत. मात्र त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम मात्र पडलेली नाही.याबाबत भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन व्यथा मांडली. (Farmers fury for debt relief scheme Jalgaon News)

Incentives will not accrue; Complaint of farmers in Bhadgaon taluka
Crime News : खोट्या अनुभवपत्रामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत दोन लाखांच्या आतील मुद्दल व व्याज रक्कम थकबाकीदारांना माफ करण्यात आली होती तर दोन वर्षांच्या कालखंडानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मुदतीत पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये ५० हजारापर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली होती.

नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात ५७ हजार २३१ इतकी आहे.
शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा शासनाच्यावतीने केली जात आहे. योजनेचे लाभार्थी असूनही लाभ मिळत नाही. त्यासाठी शासनाचे दरवाजे शेतकऱ्यांना ठोठावे लागत आहेत.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Incentives will not accrue; Complaint of farmers in Bhadgaon taluka
Ahmednagar News : अत्याचार करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप

शेतीची कामे सोडून शेतकऱ्यांना तहसीलदारांच्या कार्यालयात रोज फेरफटका मारावा लागत आहे. तहसीलदारांनी त्वरित यावर कारवाई करावी व योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर सन्मानपूर्वक प्रोत्साहनपर अनुदान वितरित केले जावे, ही शेतकरी वर्गातून मागणी होत आहे. त्यावर त्वरित निर्णय न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. वेळप्रसंगी तहसील परिसरामध्ये उपोषणाला बसण्याची तयारी संबंधित शेतकऱ्यांनी दर्शवलेली आहे. याप्रसंगी राजेंद्र देसले, नितीन भोसले, विष्णू भोसले यांनी शेतकऱ्यांच्यावतीने तहसीलदारांना निवेदनपर अर्ज केलेला आहे.

भडगाव तालुक्यात तीन हजारांवर कर्जखाती
प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी विशिष्ट क्रमांकांची यादी २३ डिसेंबरला प्रसिद्ध होऊन ५७ हजार २३१ शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध झाली आहेत. विशिष्ट क्रमांकाच्या यादीमध्ये जिल्हा सहकारी बँकेचे आजपर्यंत एकूण ४५ हजार ८८ व राष्ट्रीयकृत बँकांचे १२ हजार १४३, असे एकूण ५७ हजार १३१ कर्जखाती आली आहेत. एकट्या चाळीसगाव तालुक्यात ३ हजार ६७ कर्जखाती आहेत.

Incentives will not accrue; Complaint of farmers in Bhadgaon taluka
Akola News : मदत मिळाली पण शेतकऱ्यांच्या पदरी प्रतीक्षा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.