मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : एकीकडे उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने तरूणाई हताश झालेली असताना सायगाव येथील उच्चशिक्षीत तरुण शेतकऱ्यांनी नोकरीची वाट न पाहता, महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या ‘विकेल ते पिकेल’ योजनेचा आधार घेऊन तालुका कृषी कार्यालयामार्फत वसुंधरा सेंद्रीय बहुउदेशीय शेतकरी गट स्थापन केला व सेंद्रीय भाजीपाला उत्पादीत करून तो विक्रीसाठी थेट ग्राहकांपर्यंत पोहचवून शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. सेंद्रीय शेतीमार्फत पिकवलेल्या जाणाऱ्या भाजीपाल्याला बाजारात ग्राहकांकडून चांगला दर मिळत असल्याने सेंद्रीय शेंतीच्या माध्यमातून प्रगतीचा हा मार्ग प्रेरणा देणारा ठरत आहे.
एकीकडे शेती परवडत नसतांनाही आणि नोकरीची शाश्वती नसतांना देखील हातावर हात घालून बसून राहण्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास विकेल तरुणांना आकर्षित करीत आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाचे प्रोत्साहन लाभत आहे. या अनुषंगाने विकेल ते पिकेल योजनेचा आधावर सायगाव येथील वसुंधरा सेंद्रिय बहुउदेशीय शेतकरी गटाने भाजीपाल्याची लागवड केलेली असून योग्य तो बाजार भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला विक्रीचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाला कृषी उपसंचालक जळगाव अनिल भोकरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक ज्ञानेश्वर पवार,पल्लवी हिरवे मंडळ कृषी अधिकारी मेहुनबारे संपदा पाटील यांचे योगदान मार्गदर्शन लाभले. सेंद्रीय पद्धतीने उत्पादीत या भाजीपाला थेट ग्राहकांना विक्रीची सुरूवात चाळीसगांव शहरातील श्रीपाद नगरमधुन नुकतीच करण्यात आली.चाळीसगांव शहरात दिवसभर विविध ठिकाणी ताजा सेंद्रिय भाजीपाला विक्री करण्यात येत असून संपूर्ण माल हा चांगल्या प्रतिसादाने विकला गेल्याची माहिती मंगेश महाले यांनी दिली.
शेतकरी गटातून साधला प्रगती
वसुंधरा सेंद्रिय बहुउदेशीय शेतकरी गट अंतर्गत विविध प्रकारचा भाजीपाला उत्पादन करत असून संपूर्ण शेती ही सेंद्रिय पद्धतीने करण्यात येते.गटअंतर्गत गावातील विविध शेतकरी विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. मंगेश महाले हे गटाचे अध्यक्ष असून त्यांच्या शेतातील गिलके, दोडके, कारले, दुधीभोपला, काकडी, वाल, टोमॅटो, मुळा आदी भाजीपाला लागवड करण्यात आल आहे. तर सुरेश सोनवणे हे उपाध्यक्ष असून त्यांच्या शेतात लिंबू व मिरची, सदस्य राहुल महाजन यांच्या शेतात बीट, फुल कोबी, दुसरे सदस्य ज्ञानेश्वर माळी यांच्या शेतात वांगे, पालक, मेथी, कोथंबीर आदी भाजीपाल्यांची लागवड करण्यात आली आहे.
कृषी विभागाचे मार्गदर्शन
उत्पादित केलेल्या मालास योग्य दर मिळावा यासाठी विकेल ते पिकेल योजनेचा लाभ घेऊन शहरात थेट ग्राहकांपर्यंत पोहचून अशा पद्धतीने भाजीपाला विक्री करण्यात येईल असे या शेतकऱ्यांनी सांगितले. या संपूर्ण शेतकरी गटाला कृषी विभागाचे प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी संचालक अनिल भोकरे यांच्यासह कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळाले.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.