जळगाव : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकरी (Farmer) कमालीचे उत्सुक आहेत. केव्हा एकदाचा मॉन्सून (Monsoon) दाखल होतो व केव्हा पेरण्या (Sowing) करतो, असे शेतकऱ्यांना झाले आहे. खरीप हंगामासाठी कापूस पिकासाठीच्या बी. टी. बियाण्यांची (B. T. seeds) आज पासून विक्री सुरू होत आहे.
( jalgaon district b t seed sales start)
Farmer
यामुळे उद्यापासून शेतकऱ्यांच्या बियाणे खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र दिसू शकते. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणीची कामे सुरू केली आहेत. यंदा बी. टी. कपाशीच्या २६ लाख पाकिटांची मागणी करण्यात आली. त्यातील २१ लाख पाकिटे जिल्ह्यातील विक्रेत्यांकडे दाखल झाली आहेत. त्याला आतापर्यंत विक्रीस बंदी होती; मात्र मंगळवार (ता. १)पासून बियाणे विक्रेत्यांना बी.टी.ची विक्री करता येणार आहे. जूनमध्ये मृगाच्या पर्जन्यवृष्टीनंतरच बहुतांश ठिकाणी खरीप वाणांच्या पेरणीस सुरवात होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून १५ मेपासूनच मॉन्सूनपूर्व बागायती कपाशी वाणांची लागवडीस प्राधान्य दिले जात आहे. जेथे पाण्याची उपलब्धता आहे तेथे मे महिन्यातच काही शेतकऱ्यांनी परराज्यातील कपाशी वाणाची लागवड केली आहे. जिल्ह्यातील एरंडोल, शिरसोली, पाचोरा परिसरात पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांकडून खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. काही ठिकाणी कपाशी वाणाची लागवड सुरू झाली आहे. मॉन्सूनपूर्व लागवड केलेल्या रोपांवर गेल्या दोन-तीन वर्षांपासून लाल्या, गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे जमिनीत किमान आठ ते दहा इंच पुरेशी ओल असल्याशिवाय कोणत्याही खरीप वाणांची लागवड करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांनी मॉन्सूनचा समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय कपाशी वाणांसह अन्य कोणत्याही वाणांची पेरणी करू नये. मॉन्सूनचा पाऊस अजून झालेला नाही. यामुळे पेरणीची घाई शेतकऱ्यांनी करू नये. दमदार पाऊस होऊ द्यावा.
-संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी
२१ लाख पाकिटे उपलब्ध
जिल्ह्यात यंदा २६ लाख बी. टी. बियाण्यांच्या पाकिटांची मागणी करण्यात आली. त्यापैकी २१ लाख पाकिटे उपलब्ध झाली आहे. मंगळवार (ता. १)पासून विक्रीस परवानगी आहे. विविध खतांचा एक लाख टन साठा उपलब्ध झाला आहे. खते सुधारित किमतीत उपलब्ध आहेत. त्यापेक्षा अधिक दराने विक्री झाल्याचे आढळल्यास त्याची शेतकऱ्यांनी तक्रार करावी.
- वैभव शिंदे, मोहीम अधिकारी
फळपिकांच्या नुकसानीची
माहिती कृषी विभागाला द्या
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहारकरिता अधिसूचित फळपिकांना लागू करण्यात आली आहे. या योजनेत आता अंबिया बहाराकरिता मोसंबी, डाळिंब, केळी व आंबा या पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रात राबविण्यात येत आहे. ही योजना आता केळी व आंबा या पिकांसाठी लागू आहे. तेव्हा नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या फळपिकांची माहिती विमा कंपनी व कृषी विभागास (तालुकास्तरावर) त्वरित कळविणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनी, महसूल विभाग व कृषी विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे पंचनामे त्वरित करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.