चोरीत बाप नंबरी बेटा दसनंबरी; लाखांचे केले मोबाईल लंपास

अनेक दुकानदारांना गंडा घालणाऱ्या या भामट्या पिता- पुत्राने हात साफ करत असल्याची कबुली दिली आहे.
mobile theft
mobile theftesakal
Updated on

जळगाव : गोलाणी मार्केटमधील दुकानात मोबाईल खरेदी करण्याचा बहाणा करून तब्बल १ लाख ६५ हजार १७० रूपये किमतीचे महागडे ११ मोबाईल चोरणाऱ्या पिता-पुत्राला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक येथून अटक केली आहे. अनेक दुकानदारांना गंडा घालणाऱ्या या भामट्यांमध्ये मुलगा दुकानदारांना बोलण्यात गुंतवत असे, तोपर्यंत बाप मोबाईलवर हात साफ करत असल्याची त्यांनी कबुली दिली आहे.

शहरातील गोलाणी मार्केटमधील गुरूकृपा मोबाईल केअर या दुकानावर संशयित आरोपी कैलास लालवाणी आणि सुमीत ललवाणी असे दोघ पिता-पुत्र मंगळवारी(ता. १४) आले. मोबाईल घेण्याचा बहाणा करून त्यांनी तब्बल १ लाख ६५ हजार रूपये किंमतीचे महागडे ११ मोबाईल दुकानदाराला बेालण्यात गुंतवत चोरुन नेले. याबाबत बुधवारी (ता. १५) शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित पितापुत्राचा माग घेताना चोरीचे मोबाईल घेऊन भामटे पिता-पुत्र मुंबईच्या दिशेने गेल्याची खात्री झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहायक फौजदार रवि नरवाडे, युनूस शेख, संजय हिवरकर, सुनील दामोदरे, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे आदींचे पथक त्यांच्या मागाला लागले. तोपर्यंत निरीक्षक बकाले यांनी लोहमार्ग पोलिस स्टेशन नाशिक व रेल्वे सुरक्षा बल नाशिक यांच्याशी संपर्क साधून दोघा पिता पुत्रांचे छायाचित्र पाठवून त्यांना अडविण्याची विनंती केली. दोघांना नाशिक रेल्वेस्थानकावर अटकाव होताच गुन्हे शाखेचे पथक मागील गाडीने नाशिक धडकले. दोघा पिता पुत्राला नाशिक रेल्वेस्थानकातून ताब्यात घेत अटक करण्यात आली.

mobile theft
कुटूंबीय झोपेत असतांना घरात चोरी

विविध ठिकाणी गुन्हे दाखल

ताब्यातील दोघांची अधिक चौकशी केली असता कैलास श्रीबलराम लालवाणी (वय ४८) आणि सुमीत कैलास ललवाणी (वय २३, दोन्ही रा. वारसीया परिसर सिंधी कॉलनी, बडोदरा, गुजरात) या संशयितांवर मध्यप्रदेशातील इंदौर, राजस्थानातील जोधपूर यांसह अकोला, मुंबई, पुणे, कोटा अशा विविध शहरांमध्ये लाखो रुपयांचे मोबाईल चोरुन नेल्याचे गुन्हे दाखल आहेत. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्यावर झडप घालत पाहुणचार केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी दोघांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

mobile theft
लाच स्वीकारताना कारकुनाला दुसऱ्यांदा पकडले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.