Jalgaon MSEDCL News : चूक महावितरणची, भुर्दंड ग्राहकांना

MASEDCL News
MASEDCL Newsesakal
Updated on

भुसावळ : शहरात वीज वितरण कंपनीच्या ग्राहकांना वीजपुरवठ्यासह अव्वाच्या सव्वा बिल देऊन 'शॉक' देणे सुरूच आहे. कित्येक ग्राहकांचा विजेचा वापर कमी आहे अन् त्यांना बिल मात्र प्रमाणापेक्षाही अधिक आले आहे. चार ते पाच आकडी बिलाच्या रकमेने ग्राहकांना घाम फोडला आहे.

शहरात वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरात २०१९ मध्ये जिनस कंपनीने आर. एफ. टेक्नॉलॉजीचे मीटर ग्राहकांच्या घरी बळजबरीने बसविले. त्यानंतर अनेक ठिकाणी वीज ग्राहकांना दुसऱ्याच ग्राहकाच्या नावाचे मीटर बसविण्यात आले आहे, अशा तक्रारी वाढल्यात. (Fault of Mahavitaran Lose customers Jalgaon News)

MASEDCL News
Jalgaon News | कुऱ्हा वढोदा सिंचन योजनेस 2226 कोटींची सुधारित मान्यता : रक्षा खडसे

अनेक ग्राहकांनी याबाबतीत तक्रारही दाखल केल्यात, परंतु अजूनही भुसावळ विभागातील शेकडो तक्रारी प्रलंबित आहेत. वीजबिल सक्तीने वसूल करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली असून, वापर न केलेल्या रीडिंगची वीज देयके अदा करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना त्रास देत आहे, याबाबतची तक्रार प्रा. धीरज पाटील यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

तीन वर्षांपासून त्रास

भुसावळ शहरातील हुडको कॉलनी परिसरातील वीज ग्राहकाला (११७७५४०६६९०८) तीन वर्षांपासून दुसऱ्याच ग्राहकाचे वीज देयक दिले जात आहे. वारंवार तक्रार दाखल केल्यानंतरही सुधारणा करण्यात आली नाही. दुसऱ्या ग्राहकाचा वापर जास्त आहे आणि आम्ही भाड्याच्या घरात राहतो. वीज देयक कसे भरणार याची काळजी सतावते, अशी व्यथा वीज ग्राहक लतेश भारंबे यांनी मांडली.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

MASEDCL News
Jalgaon News : वावडेत यांत्रिकीकरणातून मजूरटंचाईवर मात

अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी,

दाद मागावी कुणाकडे?

शहरातील हुडको कॉलनीतील वीज ग्राहकाला दुसऱ्याच ग्राहकाचे वीज देयक दिले जात असल्याच्या तक्रारीबाबत जीनस कंपनीचे आयटी मॅनेजर विजय पालवार यांच्याशी संपर्क साधला असता माझ्याकडे तक्रार आलेली आहे, ती तक्रार भुसावळचे मुख्य अभियंता प्रदीप गरुड यांच्याकडे पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे याबाबत मुख्य अभियंता गरुड यांना विचारले असता त्यांनी माझ्याकडे याबाबत कुठलीही तक्रार आली नसल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित कंपनी व महावितरण अधिकारी यांच्यात कुठलाही समन्वय नसल्याचे यावरून दिसून येते. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्‍न कसे सुटणार हा प्रश्‍नच आहे.

"गेल्या तीन वर्षांपासून मला दुसऱ्याच ग्राहकाचे वीज देयक दिले जात आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्याला विचारणा केली तर जिनस कंपनी सुधारणा करीत नाही, असे सांगतात. जिनस कंपनीच्या अधिकाऱ्याला विचारणा केली असता महावितरण सुधारणा करीत नाही, असे सांगितले जाते. नक्की न्याय मागायचा कोणाला हेच समजत नाही?"

- लतेश भारंबे,वीज ग्राहक, भुसावळ

MASEDCL News
Jalgaon News : पाळीव कुत्रा चावल्याने मालकावर गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.