Jalgaon Water Scarcity: जिल्ह्यात जूनअखेर 592 गावात पाणीटंचाई झळांची भीती

 Water scarcity
Water scarcityesakal
Updated on

Jalgaon Water Scarcity : जिल्ह्यात यंदा कमी झालेल्या पावसामुळे सुमारे ५९२ गावात पाणीटंचाईच्या झळा जाणवणार आहेत. जिल्हा प्रशासन ‘ॲलर्ट मोड’वर असून ५९२ ठिकाणी उपाययोजना करण्यास सुमारे ९ कोटी ९० लाख ७६ हजारांचा पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे.

सध्यस्थितीत १२ गावात १३ टँकर सुरू आहेत. त्यात चाळीसगाव तालुक्यातील विसापूर तांडा, अंधारी, करजगाव, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राहमण शेवगे, घोडेगाव, हातगाव भिल्लवस्ती या गावांचा समावेश आहे. (Fear of water shortage in 592 villages by end of June in district jalgaon news)

‘अलनिनो’मुळे यंदा एप्रिलमध्ये पाऊस झाला होता. मेमध्ये तापमानाने उच्चांक गाठला. दरवर्षी सात जूनला सुरू होणारा पाऊस जूनच्या अखेरीस उशिराने सुरू झाला. एक महिना पावसाची प्रतीक्षा करावी लागली. जुलैमध्ये चांगल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या झाल्या. मात्र ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने पेरण्या वाया जाण्याची भीती निर्माण झाली. सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले.

पण उत्पादनात कमालीची घट झाली. बागायती कापसाचे उत्पादन आले. मात्र कोरडवाहू कापसाचे उत्पादन घटले. सप्टेंबर, ऑक्टोबरमधील पावसाने हतनूर, वाघूर, गिरणा धरणात चांगला पाणीसाठा झाला. हतनूर ९० टक्के, तर वाघूर शंभर टक्के भरले.

त्यामुळे भुसावळ परिसरातील यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जामनेर, जळगाव तालुक्यातील पाणीटंचाई मिटण्यास मदत झाली. असे असले तरी चाळीसगाव तालुक्यात कमी पाऊस झाल्याने हा तालुका दुष्काळी जाहीर झाला. इतर अनेक तालुक्यात कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र होणार आहेत.

 Water scarcity
Unseasonal Rain Damage: अवकाळीग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष पॅकेजचा प्रस्ताव : मंत्री अनिल पाटील

पाणीटंचाईचे तीन टप्पे

जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाईचे तीन टप्पे केले आहेत:-

० ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ पर्यंत जिल्ह्यातील ४७ गावात पाणीटंचाई जाणवणार

० पहिल्या टप्प्यासाठी ४७ ठिकाणी उपाययोजना. त्यासाठी २ कोटी २६ लाख ६० हजारांचा आराखडा

० जानेवारी ते मार्च २०२४ मध्ये टंचाईच्या दुसऱ्या टप्प्यात १४९ गावात पाणीटंचाई जाणवणार

० दुसऱ्या टप्प्यातील उपाययोजनांसाठी २ कोटी ४३ लाख २ हजारांचा आराखडा

० एप्रिल ते जून २०२४ मधील तिसऱ्या टप्प्यात ३९६ गावात पाणीटंचाईच जाणवणार

० तिसऱ्या टप्प्यातील उपाययोजनांसाठी ५ कोटी २० लाख ९४ हजारांचा आराखडा

"जिल्ह्यात जून २०२४ अखेर ५९२ गावे पाणीटंचाईची जाणवेल असा अंदाज आहे. त्यासाठी ९ कोटी ९० लाख ७६ हजारांचा संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. टंचाईवर उपाययोजना करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे." - आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव.

 Water scarcity
Water Scarcity: टंचाई कृती आराखडा अंतिम टप्प्यात, डिसेंबरअखेर टँकरची संख्या वाढण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.