Jalgaon News : ‘ऑफलाइन’ प्रशिक्षण नि:शुल्क; आता ‘ऑनलाइन’ला शुल्क का?

Teacher
Teacheresakal
Updated on

Jalgaon News : शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी विविध प्रशिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षण विभागावर आहे. मात्र हाच शिक्षण विभाग आता व्यावसायिक होत असल्याचे दिसून येत आहे. (fee of Rs 2000 is being charged for senior selection category training of teacher jalgaon news)

गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही वरिष्ठ, निवड श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी दोन हजार रुपयांची शुल्क आकारणी केली जात आहे. एकीकडे हे प्रशिक्षण ‘ऑनलाइन’ असल्याने कुठलेही भौतिक सुविधा देण्याची गरज नाही, मग दोन हजार रुपये फी कशासाठी? असा प्रश्न विचारला जात आहे.

पूर्वी हेच ‘ऑफलाइन प्रशिक्षण’ नि:शुल्क होते, अन् वरून शिक्षकांना ‘प्रशिक्षण भत्ता’ मिळायचा तो वेगळाच! परिणामी, शासनाने शिक्षकांचे हे प्रशिक्षण इतर प्रशिक्षणाप्रमाणे निःशुल्क करावे, यासाठी सर्व शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, विविध शिक्षक संघटना यांनी एकत्र येऊन दबाव गट तयार करणे गरजेचे आहे.

राज्यात २०२१-२०२२ या वर्षी ९५ हजार ५४२ शिक्षकांनी वरिष्ठ व निवड श्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण घेतले होते. अजूनही बरेच शिक्षण प्रशिक्षणापासून वंचित होते. या पार्श्वभूमीवर या प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांची नावनोंदणी करण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक शरद गोसावी यांनी शुक्रवारी परिपत्रक काढले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Teacher
Jalgaon News : महापालिकेचा अतिक्रमणावर हातोडा; फुले मार्केटमध्ये लोखंडी रॅक जप्त

यानुसार वरिष्ठ व निवडश्रेणी प्रायोजन व सनियंत्रणाची जबाबदारी ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली असून, या प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणीसाठी परिषदेमार्फत https://training.scertmaha.ac.in हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य यांनी नोंदणी करता येणार आहे.

कोण ठरणार आहेत पात्र...

३१ मार्च २०२४ ला १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्ष सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

Teacher
Vehicle Auction : जिल्हाधिकारी कार्यालयातील 16 वाहनांचा लिलाव; या तारखेपासुन प्रक्रिया

तसेच ३१ मार्च २०२४ ला २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील. हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून, नोंदणी २९ मे २०२३ ते १२ जून २०२३ पर्यंत करता येणार आहे.

‘शालार्थ आयडी’ नसलेल्यांनाही प्रशिक्षण!

गेल्या वेळेस या प्रशिक्षणासाठी प्रत्येक शिक्षकाला शालार्थ आयडीची सक्ती करण्यात आली होती. मात्र आजही अनेक विनाअनुदानित , अंशतः अनुदानित , स्वयंशासित शाखेतील शिक्ष‘कांना शालार्थ आयडीच दिलेला नाही.

तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षकांकडेही शालार्थ आयडी नाहीत. असे शिक्षक प्रशिक्षणापासून वंचित राहू शकतात. यासाठी शालार्थ आय. डी. नसणाऱ्या शिक्षकांनाही हे ऑनलाइन प्रशिक्षण घेता यावे यासाठी त्याच्या नावनोंदणीसाठी वेगळा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे त्या शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Teacher
Rain Update : पहाटे सोसाट्याचा वारा अन्‌ पावसाची हुलकावणी; दिवसभर घामाच्या धारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()