Jalgaon Fraud Crime : जीवनसाथी ॲपच्या माध्यमातून महिला वनरक्षकाला गंडविले

female forest guard was cheated Through Jeevansathi app jalgaon crime news
female forest guard was cheated Through Jeevansathi app jalgaon crime news
Updated on

Jalgaon Fraud Crime : चोपडा तालुक्यात महिला वनरक्षक पदावर कार्यरत ३३ वर्षीय तरुणीने जीवनसाथी ॲपवर रजिस्ट्रेशन केले होते. संबंधित सायबर गुन्हेगारांनी जीवनसाथी ॲपच्या माध्यमातून सावज हेरत संपर्क वाढविला.

भूलथापा देत चक्क चार लाख ८९ हजार रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (female forest guard was cheated Through Jeevansathi app jalgaon crime news)

सायबर गुन्हेगारीचे विश्व दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे. ऑनलाइन पद्धतीने पैशांचे व्यवहार करणारे, विविध वेबपोर्टलवर वैवाहिक कारणांसाठी किंवा नोकरी कामानिमित्त अपलोड केलेल्या माहितीचा दुरुपयोग करून सायबर गुन्हेगारांकडून आर्थिक फसवणूक केली जात आहे.

डॉ. सनिष अमितराव पेमा याने विविध इलेक्ट्रिक संसाधनाचा वापर करून तक्रारदार महिलेशी जीवनसाथी ॲपवर संपर्क केला.

female forest guard was cheated Through Jeevansathi app jalgaon crime news
Nashik Fraud Crime: दामदुपटीच्या आमिषाने सिनेस्टाइल फसवणूक; मुंबई नाका पोलिसांत 10 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा

त्यानंतर विश्वास संपादन करून वेगवेगळ्या कारणांचा हवाला देत गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथील बँक खात्यावर पेटीएमद्वारे चार लाख ८९ हजार रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार समोर आला.

पैसे दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेत तक्रार दिल्यावरून संशयितांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.

female forest guard was cheated Through Jeevansathi app jalgaon crime news
Nashik Fraud Crime: ऑनलाइन सातबारा उताऱ्यामुळे भामट्याचा भांडाफोड; संशयिताकडे बनावट शेतकऱ्याचा पुरावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()