जळगाव : कोरोना (Corona) महामारीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनापासून आमचा जीव वाचविला. सारे जग अगतिक असताना आम्हाला भयमुक्त ठेवले. भावाने केलेल्या बहिणीच्या रक्षणाच्या उदात्त भावनेने महिलांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (जीएमसी)डॉक्टरांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले. (Latest Marathi News)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोना महामारीच्या काळात शुभांगी वाणी व शीतल वाणी यांना कोरोना महामारीची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल होत्या. प्रसंगी रुग्णालयात कोरोनामुळे भीतीचे वातावरण होते. मात्र पूर्ण रुग्णालयात भयमुक्त वातावरण ठेवून निःस्वार्थ भावनेने उपचार करून आमच्यासह अनेक रुग्णांचा डॉक्टरांनी जीव वाचविला. भावाने बहिणीचे रक्षण केले, अशी उदात्त भावना ठेवून अनोखे रक्षाबंधन साजरे केले.
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना राखी बांधून त्यांच्यबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. औैषध वैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. विशाल आंबेकर, डॉ. विपिन खडसे यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
डॉ. प्रथमेश पाटील, डॉ. प्रतीक्षा मुळे, डॉ. करण चत्तर, विश्वजित चौधरी, राज्य परिचारिका संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयश्री जोगी, औषधनिर्माण अधिकारी रितेश वाणी, संदीप माळी आदी उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.