जळगाव : रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशिन बंद ठेवून ७, ८ व ९ फेब्रुवारीला धान्य वितरण थांबवावे, असा प्रस्ताव अखिल महाराष्ट्र सरकारमान्य रेशन दुकान परवानाधारक महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
मात्र, त्याला दुकानदारांनी प्रतिसाद न देता अनेक रेशन दुकानदार ई-पॉस मशिनद्वारे थम घेऊन धान्य वितरण करताना दिसून आले. यामुळे रेशनकार्डधारकांची गैरसोय टळली आहे. (Fiasco of closure of ration shops in district Distribution of grain to several shops Avoid inconvenience to citizens Jalgaon News)
राज्यातील रेशन दुकानदारांचे अनेक प्रलंबित प्रश्न, दुकानदारास मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ, मोफत वाटप केलेल्या धान्याचे कमिशन, देशातील काही राज्यांत रेशन दुकानदारास मिळणारे मानधन महाराष्ट्रातही मंजूर करावे, वर्ल्ड फूड प्रोग्राममध्ये रेशन दुकान परवानाधारकास समाविष्ट करावे, रेशन दुकानदारास वाहतूक ठेकेदाराकडून पूर्ण वजनाचे धान्य मिळावे आदी मागण्यांबाबत मंगळवार (ता. ७)पासून ९ फेब्रुवारीपर्यंत ई-पॉस मशिन बंद ठेवून धान्य वितरण बंद ठेवण्यात येणार होते.
हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
ई-पॉस मशिन बंद ठेवून कार्डधारकांना धान्य न देता परत पाठविण्याचे ठरविले होते. मात्र, अनेक दुकानांनी ई-पॉस मशिनद्वारेच अनेक कार्डधारकांना धान्याचे सुरळीतपणे वितरण केले. राज्याच्या आधार इनब्लड पब्लिक डिस्ट्रीबुश्यन सिस्टिम प्रणालीवर दुपारी दोनपर्यंत एकूण राज्यभरात ३४ हजार ४७८ ई-पॉस मशिनद्वारे धान्य दिल्याची नोंद होती.
जळगाव जिल्ह्यात ४८० जणांना धान्य दिल्याची नोंद होती. ई-पॉस मशिन बंद ठेवण्याचे ठरले असताना, धान्य वितरण होत असल्याबाबत अध्यक्ष जमनादास भाटिया यांच्याशी संपर्क साधला असता, मागील महिन्यातील धान्याचे वितरण होत असेल. या महिन्याचे नाही. आमचे ई-पॉस मशिन बंद आहे.
"रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाला कळविले आहे. शासनच निर्णय घेऊ शकते. काही दुकानांतून धान्य वितरण सुरू आहे. काहींनी बंद ठेवले आहे."
-प्रशांत कुलकर्णी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.