जळगाव : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या १९ व्या महाराष्ट्र (Maharashtra) राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीला मंगळवार (ता. ७)पासून जळगाव केंद्रावर सुरवात होत आहे. (Final round of rajya bal natya spardha from 7 march jalgaon news)
मंगळवारी सकाळी अकराला जळगाव शहरातील छत्रपती संभाजी नाट्यगृहात अंतिम फेरीचे उद्घाटन होईल. ज्येष्ठ रंगकर्मी प्रांजल रस्से, दिशा ठाकूर, रूपाली गुंगे, अलका भटकर, पूनम जावरे या महिलांच्या हस्ते या फेरीचे उद्घाटन होईल.
१० मार्चपर्यंत रोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा, या वेळेत महाराष्ट्रातून विविध केंद्रांत विजेते ठरलेले २३ बालनाट्य जळगाव केंद्रावर सादर होतील.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
मंगळवारी सादर होणारी नाटके
सकाळी दहाला ‘काश्मीर स्माइल’, अकराला ‘चम चम चमको’, दुपारी सव्वाबाराला ‘तळमळ एका अडगळीची’, दुपारी दीडला ‘अजब लोट्यांची महान गोष्ट’.
बुधवारी होणारी नाटके
सकाळी अकराला ‘गोष्टीची स्टोरी’, दुपारी सव्वाबाराला ‘बदला’, दीडला ‘ध्येय’, पावणेतीनला ‘जादूगार’, चारला ‘यम्मी मम्मी आणि टम्मी’, सायंकाळी साडेपाचला ‘गुहेतील पाखरे’.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.