Jalgaon Crime News : अखेर ‘ती’ 29 अल्पवयीन मुले बिहारकडे रवाना; बालकल्याण समितीकडे करणार सुपूर्द

Child Trafficking
Child Traffickingesakal
Updated on

Jalgaon Crime News : येथील रेल्वे पोलिसांनी बिहार राज्यातून सांगलीकडे जाणाऱ्या २९ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते.

या प्रकरणी रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल होऊन या मुलांना जळगावच्या बालकल्याण समिती अंतर्गत सुधारगृहात ठेवण्यात आले होते.

दरम्यान, या २९ मुलांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मंगळवारी (ता. २९) बिहारकडे रवाना करण्यात आले. (Finally 29 minors left for Bihar bhusawal jalgaon crime news)

येथील रेल्वे सुरक्षा बलाने ट्विटरद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीवरून दानापूर एक्स्प्रेमधून बिहार राज्यातून आलेल्या २९ अल्पवयीन मुलांना भुसावळ रेल्वेस्थानकावर उतरवण्यात आले होते. तसेच एका व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर. के. मीना व लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय घेरडे यांनी ही कारवाई केली होती. या प्रकरणी त्या बालकांना जळगाव बालकल्याण समिती अंतर्गत बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते.

या मुलांना मंगळवारी (ता.१३) जिल्ह्याधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशाने बिहारकडे रवाना करण्यात आले. तेथील बालकल्याण समितीसमोर या मुलांना उपस्थित केले जाणार आहे. त्यांच्यासोबत रेल्वे सुरक्षारक्षक सोबत तैनात केले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Child Trafficking
Drug trafficking : डॉक्टर म्हणाले, ...तर गेला असता तस्कर महिलेचा जीव

भागलपूर एक्स्प्रेसने रवाना

दरम्यान, मंगळवारी (ता.१३) सर्व मुलांना एलटीटी भागलपूर एक्स्प्रेसने (गाडी क्रमांक १२२३६) विकलांग बोगीमधून या २९ बालकांसह सुधारगृह विभागातील परीक्षक अधिकारी राहुल भालेराव, बाल संरक्षण अधिकारी संभाजी राठोड व जळगाव पोलिस दलाचे १७ अधिकारी व कर्मचारी जीआरपीचे दोन असा ५० जणांचा ताफा बिहारकडे रवाना झाला.

ही बोगी आरक्षित म्हणजे स्लीपरप्रमाणे नसून विकलांगसाठी ३१ बैठक सीटची आहे. त्या मधून बालकांसह असे एकूण ५० जण प्रवास करणार आहे. या ठिकाणी पोचल्यावर या २९ मुलांना बिहार येथील बालकल्याण समितीसमोर उपस्थित करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक विजय घरडे यांनी दिली.

Child Trafficking
Child Trafficking : मुलांच्या तस्करीप्रकरणी संशयितास न्यायालयीन कोठडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com