Kiran Kumar Bakale Case : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.
गुरुवारी (ता.१८) युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर शुक्रवार (ता. १९) बकाले यांच्या जामीन अर्जाविषयी निर्णय देत मुख्य न्यायदंडाधिकारी विनय मुगळीकर यांनी जामीन मंजूर केला. (Finally conditional bail to Kiran Bakale jalgaon news)
गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेसोळा महिन्यांनी बकाले हजर झाल्यानंतर अटक करण्यात आली. दोन दिवसांची पोलिस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
बकाले यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर गुरुवारी त्यावर युक्तिवाद पूर्ण झाला.
सरकारपक्षातर्फे सरकारी वकील रंजना पाटील यांनी युक्तिवाद केला तर बकाले यांच्या तर्फे ॲड. सूरज जहागीर यांनी तर हरकतदारांतर्फे ॲड. गोपाळ जळमकर यांनी बाजू मांडली.
तिन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी विनय मुगळीकर यांनी काल निकाल राखून ठेवला होता. यावर शुक्रवार (ता. १९) निर्णय देत बकालेला जामीन मंजूर केला.
चौकट
या आहेत अटी
- पोलिस बोलावतील त्यावेळी हजर राहावे लागेल.
- साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये.
- गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करावे लागेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.