शेतकऱ्यांची होतेय आर्थिक पिळवणूक; खरिपात खतांच्या किमतीत 3 पट वाढ

खासदार, आमदारांनी रासायनिक खतांच्या दरवाढीबाबत केंद्र शासनाकडे आवाज उठवावा, झालेली दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Farmer in crisis
Farmer in crisissakal
Updated on

जळगाव : खरीपाच्या हंगामात चांगला पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. असे असताना रासायनिक खतांच्या किमतीत दोन महिन्यात तब्बल शंभर ते अडीचशे रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या गळचेपी करणारी आहे. जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी रासायनिक खतांच्या दरवाढीबाबत केंद्र शासनाकडे आवाज उठवावा, झालेली दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (Latest Marathi News)

Farmer in crisis
बंद होणार रेडिओ, GPS,सॅटेलाईट ...पृथ्वीवर येतंय 'महासंकट'!

मागील दोन दिवस पावसाने चांगली उघडीप दिली होती. यामुळे शेतकऱ्यांनी शेतात कोळपणी, निंदणी, पिकांना खते देण्याची कामे सुरू केली आहेत. खते घेताना सर्वच रासायनिक खतांच्या किमती वाढलेल्या आढळून आल्या. सुपर फॉस्फेटची एक बॅग जून महिन्यात ५०० रूपयाला मिळत होती. ती या महिन्यात (जुलै) सहाशे रूपयांना मिळत आहे. ऑगस्टमध्ये ती साडेसातशे रूपयांना मिळेल, असे बियाणे विक्रेते सांगतात. १०ः२०ः२० हे खत गतवर्षी १२५० रूपयांना मिळत होते ते यंदा १४७० रूपयांना मिळत आहे. पोटॅश एक हजार रूपयांना मिळत होते ते १७०० रूपयांना मिळत आहे. १५ः१५ः१५ खत ११५० ला मिळत होते ते आता १४७० रूपयांना मिळत आहे. केंद्र शासनातर्फे गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली.

पेट्रोल डिझेलचे दर वाढले

रासायनिक खतांच्या किमतीत दुप्पट तिप्पट वाढ झाली आहे. अन्नधान्यावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा विचार सुरू आहे. केंद्र शासन महागाई वाढविणारे शासन असल्याच्या भावना शेतकऱ्यांच्या आहेत. इंधन वाढल्याने ट्रान्स्पोर्टच्या खर्चात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावर खासदारांनी आवाज उठविण्याची मागणी होत आहे.

Farmer in crisis
Income Tax रिफंड क्लेम केल्यानंतरही खात्यात येणार नाहीत पैसे ? पाहा नियम...

''रासायनिक खतांचे दर वाढीच्या तक्रारी आल्या आहेत. मात्र त्यावर नियंत्रण केंद्र शासनाचे आहे. खतांच्या किमतीबाबत शेतकऱ्यांच्या नाराजीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना, कृषी आयुक्तांना देण्यात येईल.'' - संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.

''सुपर फॉस्फेटच्या दरात दोनच महिन्यात शंभर रूपयांची अचानक वाढ करण्यात आली आहे. अजून या किंमतीत वाढ होईल, असे बियाणे विक्रेते सांगतात. खरीपाचा हंगाम सुरू असून आता खतांची नितांत गरज आहे. अशावेळी किमती वाढविणे शेतकऱ्यांना महागाईच्या खाईत ढकलण्यासारखे आहेत.'' - विजय झोपे, शेतकरी, बांभोरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.