यावल - तालुक्यातील गिरडगावजवळ केळीच्या बागेला आग लागून साडेपाच हजार केळीची खोडे जळाले. यात दोन शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी (ता. १९) दुपारी एकच्या सुमारास घडली. चार तासानंतर यावल पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आग कशामुळे लागली, हे मात्र कळू शकले नाही.
गिरडगाव (ता. यावल) येथील आदिवासी पावरा वस्तीला लागून शेतकरी गोरख पाटील व त्यांच्या बांधाला लागून बापू ठाकूर (रा. किनगाव) यांची शेती आहे. या दोन्ही शेतात केळीची लागवड केली होती. केळीच्या शेतात मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीची घटना लक्षात येताच गिरडगावचे पोलिसपाटील अशोक पाटील, एसटीचालक भय्या पाटील, ज्ञानेश्वर पाटील, बापू पाटील, मधुकर पाटील यांनी तातडीने अग्निशमन दलाचा बंब बोलावला व पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक आशिष कांबळे, हवालदार जगन पाटील दाखल झाले. तातडीने यावल नगरपालिकेचा अग्निशमन दलाचे बंबचालक दिगंबर बारी व फायरमन आकाश सोनवणे यांनी सुमारे चार तास परिश्रम घेत आग आटोक्यात आणली. आगीत दोघी शेतकऱ्यांचे मिळून सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आग वेळीच आटोक्यात आल्यामुळे इतर शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही. शेतकरी गोरख पाटील यांच्या शेतातील तीन हजार केळीच्या खोडपैकी दीड हजार खोडांना आगीचा फटका बसला. त्यांचे दोन लाखांचे नुकसान झाले, तर बापू ठाकूर यांच्या शेतातील साडेचार हजारपैकी दोन हजार केळीच्या खोडांना आगीचा फटका बसला. त्यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.