Jalgaon Fire Accident : आयुध निर्माणी परिसरात वाढत्या तापमानामुळे आग

Fire
FireSakal
Updated on

Jalgaon News : वरणगाव आयुध निर्माणीतील (ऑर्डनन्स फॅक्टरी) सुरक्षा भिंतीलगत घुमट परिसरात शुक्रवारी (ता. १९) दुपारी चारच्या सुमारास आग लागली. उन्हाळा आणि वाऱ्यामुळे आग क्षणार्धात दूरवर पसरली. (Fire due to rising temperature in ordnance factory area jalgaon fire accident news)

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथील फायर युनिटसह जळगाव, भुसावळ, सावदा, दीपनगर औष्णिक प्रकल्प, भुसावळ आयुध निर्माणी येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. दरम्यान, या आगीत कोणतीही जीवित वा मालमत्तेची हानी झालेली नाही, असे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Fire
Pune Crime : निगडे गावठी दारू साठा प्रकरणी केवळ एका आरोपीवर कारवाई ; ज्यांनी तक्रार केली त्यांना 'पाहून घेण्याची भाषा

वरणगाव आयुध निर्माणीत सुरक्षा भिंतीजवळ उभारलेल्या घुमट क्रमांक चार आणि पाचमध्ये ही आग लागली. आग एवढी भीषण होती, की बाहेरून १६ अग्निशमन बंब, तसेच ५ टँकर मागविण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सायंकाळी साडेसातला आग आटोक्यात आली.

आग गवताला लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी अमन मित्तल, नाशिक वन विभागाचे वनसंरक्षक गजेंद्र हिरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग आटोक्यात आल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवित वा मालमत्तेची हानी झाली नसल्याचे जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगितले.

Fire
Jalgoan Fire Accident : दीपनगर वीज प्रकल्पाला आग; 3 तासानंतर आगीवर नियंत्रण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.