Jalgaon Crime News : जळगावात दिवसा गोळीबाराचा थरार! गुटख्याच्या पुडीवरून ठिणगी...

Deepak Bagul and a police team investigating in the Hudko area of ​​Shivajinagar where the firing took place.
Deepak Bagul and a police team investigating in the Hudko area of ​​Shivajinagar where the firing took place. esakal
Updated on

Jalgaon Crime News : चौदा वर्षीय मुलाने त्याच्या ओळखीच्या मुलाकडे गुटख्याची पुडी मागितल्याने हाणामारी झाली. एका गटाचा जमाव अंगावर आल्याने भांडणात सहभागी अट्टल गुन्हेगाराने जमावाच्या दिशेने गोळीबार केल्याने एकच धावपळ उडाली.

शिवाजीनगर हुडकोत घडलेल्या घटनेची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांना मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले. (firing in daylight Jalgaon crime news)

असा घडला प्रकार

शिवाजीनगर हुडकोत १४ वर्षीय मुलाने त्याचा समवयस्क ओळखीच्या मुलाकडे गुटख्याची पुडी मागितली. त्याने गुटख्याची पुडी न दिल्याने वाद होऊन दोघांमध्ये शिवीगाळ, हाणामारी झाली. हाणामारीवेळी दीपक सखाराम बागूल (वय ३०) तेथे आला.

दीपकभाईच्या माणसाला मारतोय, म्हणून त्याने १४ वर्षीय मुलास मारहाण केल्याने तो तेथून पळत सुटला. त्यांच्या गल्लीतील काही तरुण आणि नातेवाइकांसह पुन्हा भांडणाच्या ठिकाणी येत असताना दिसताच दीपक जाधव याने कंबरेतून गावठी पिस्तूल काढून जमावाच्या दिशेने गोळीबार केला.

गुन्हे शाखा तत्काळ दाखल

गोळीबार होताच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांना घटनास्थळावरून फोन आला. त्यांच्या पथकातील विजयसिंग पाटील, अक्रम शेख, सुधाकर अंभोरे, प्रीतम पाटील, जितू पाटील, विजय पाटील, महेश महाजन यांनी घटनास्थळ गाठले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Deepak Bagul and a police team investigating in the Hudko area of ​​Shivajinagar where the firing took place.
Jalgaon Crime: चाळीसगावी गुप्तधन काढणाऱ्या मांत्रिकासह 9 जण ताब्यात; नाशिक जिल्ह्यातील 5 जणांचा समावेश

पाठोपाठ पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, निरीक्षक विलास शेंडे, रतन गिते, प्रफुल्ल धांडे पोचले. गोळीबार करणारा दीपक बागूल यास लोडेड पिस्तूलासह ताब्यात घेतल्यावर त्याने दोघांची नावे सांगितली. त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

"संशयित दीपक बागूल शहर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. गेंदालाल मिलमध्ये झाल्या दंगलीत शकील उस्मान सय्यद (वय २४) या हातमजुराची २०२१ मध्ये हत्या झाली होती. त्यात दीपक बागूल प्रमुख संशयित होता. यासोबतच त्याच्याविरुद्ध हाणामारी, इतर गुन्ह्यांमुळे त्याच्या प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे." -संदीप गावित, पोलिस उपअधीक्षक

खुनानंतर झाला ‘भाई’

दीपक बागूल याच्यावर गेंदालाल मिल दंगलीनंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला. जामिनावर सुटल्यापासून त्याने परिसरात बऱ्यापैकी दबदबा निर्माण केला. अल्पवयीन मुलांची टोळी तो चालवत असल्याने परिसरात त्याची प्रचंड दहशत निर्माण झाल्याचे लोकांनी सांगितले.

Deepak Bagul and a police team investigating in the Hudko area of ​​Shivajinagar where the firing took place.
Nagpur Crime News : ‘डेटिंग ॲप’वरून मैत्री करीत तरुणीवर अत्याचार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.