Jalgaon Flood News : मुक्ताईनगर, रावेर तालुक्यात पूर; बोकड नदीवरील पूल वाहून गेला

Youth missing due to flood in jalgaon
Youth missing due to flood in jalgaonesakal
Updated on

Jalgaon Flood News : तालुक्यांत संततधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळित झाले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात जोंधनखेडा येथे सातपुड्याच्या पायथ्याशी गोरक्षगंगा नदीवर असलेले कुंड धरण ओव्हरफ्लो होऊन सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. तर रावेर तालुक्यातील बोकड नदीवरील पूल वाहून गेला असून, सुकी नदीपात्रात युवक बेपत्ता झाला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील गोरक्षगंगा नदीला पूर आला असून, नदी दुथडी भरून वाहत आहे. नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Flood situation in Muktainagar Raver taluka jalgaon news)

कुऱ्हा येथे पूरस्थिती निर्माण झाली असून, पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठ आणि गावाचा संपर्क तुटला आहे.

नदीवरील पूल वाहून गेला

रावेर शहरासह तालुक्यात आज सकाळपासून दुपारी चारपर्यंत कधी मध्यम ते कधी रिपरिप पाऊस सुरू होता. मात्र मध्य प्रदेशात सातपुड्याच्या अंतर्गत भागात ढगफुटी झाल्याने तालुक्यातील नागोरी, भोकरी, मात्राण आणि सुकी नदीला देखील पूर आला.

तालुक्यातील अभोडा आणि जिन्सी या दोन गावांना जोडणारा आणि रावेरहून मोरव्हालमार्गे पालकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल बोकड नदीला आलेल्या जोरदार पुरामुळे वाहून गेल्याचे वृत्त आहे. याबाबत तहसीलदार बी. ए. कापसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही पूल वाहून गेल्याचे वृत्त कळले असून वृत्ताची खात्री करीत आहोत.

पूनखेडा (ता. रावेर) भोकरी नदीला गेल्या १५ वर्षांत प्रथमच एव्हढा मोठा पूर आला. या प्रचंड पुरामुळे यावर्षी नव्याने बांधलेल्या आणि पुनखेडा गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत होते.

तालुक्यातील अहिरवाडी- वाघोड- कर्जोद दरम्यान वाहणाऱ्या नागोरी नाल्याला मोठा पूर आला होता. या पुरामुळे अहिरवाडी - रावेर दरम्यानचाही संपर्क तुटला असून अहिरवाडी गावातील या नाल्याच्या पलीकडे असलेल्या तीन चार वसाहतींचाही संपर्क अहिरवाडीशी तुटला होता. अहिरवाडी व निरुळ येथील पाच ते सहा घरातील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Youth missing due to flood in jalgaon
Jalgaon Flood News : संततधारेने मुक्ताईनगरला पूर; हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले

युवक बेपत्ता

रावेर तालुक्यातील रोझोदा येथील युवक रवींद्र दगडू चौधरी ऊर्फ महेंद्र कोळी (वय ३३) हा सुकी नदीवर असलेल्या गारबर्डी मध्यम प्रकल्पजवळ नदीपात्रात बेपत्ता झाल्याची माहिती तहसीलदार बी. ए. कापसे यांनी दिली. शुक्रवारी (ता. २१) दुपारी बेपत्ता झालेला हा युवक आज दुपारपर्यंत सापडला नव्हता.

तालुक्यात आलेल्या एसडीआरएफच्या तुकडीने आज सकाळी नदी पात्रात त्याचा कसून शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही. त्याच्या ८ मित्रांसह सुकी नदीवरील गारबर्डी मध्यम प्रकल्पावर फिरायला गेला होता.

धरण फुटल्याची अफवा

वढोदा (ता. मुक्ताईनगर) वन परीक्षेत्रातील आणि सातपुड्याच्या कुशीत वसलेले जोंधनखेडाच्या कुंड धरणाची उंची वाढविण्यासाठीचे काम गेल्या पाच, सहा महिन्यांपासून सुरू असून, संततधार पाऊस सुरू असल्याने धरण ओव्हरफ्लो झाले आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला. मात्र काही लोकांनी धरणाची भिंत फुटल्याची अफवा पसरवली.

त्यामुळे कुऱ्हा गावासह नदीकाठावरील लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. या अफवेने तालुक्यातील संबंधित अधिकारी या ठिकाणी हजर होऊन त्यांनी परिस्थिती बघितल्यावर नदीकाठावरील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

Youth missing due to flood in jalgaon
'जेव्हा यमराज सुट्टीवर असतात'! शॉर्टकटने घरी जाण्यासाठी पुरात मारली उडी अन्...; थरारक घटना | Video Viral

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.