Valentines Day 2023 : हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे; तरुणाईची साद!

Valentine Week List 2023
Valentine Week List 2023esakal
Updated on

जळगाव :व्हॅलेंटाइन डे(Valentine's Day) साजरा करण्यासाठी काही दिवसांपासून तरुणाईची जय्यत तयारी सुरू आहे. कुठे, कधी आणि कोणते गिफ्ट द्यायचे, याचे आराखडे बांधले जात आहेत. अनेकांनी भेटवस्तू, शुभेच्छापत्रे खरेदी करण्यास सुरवात केली आहे.

त्यांच्या सोयीसाठी बाजारातील दुकाने सजली आहेत, तर आठवडाभरापासून सोशल मीडियातून विविध संदेशांमधून प्रेम व्यक्त करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. (For few days youth preparing to celebrate Valentines Day jalgaon news)

तरुणाईच्या मनामनातील भावना ‘व्हॅलेंटाइन डे’ वीकनिमित्त सोशल मीडियावर व्यक्त करीत आहेत. आठवडाभर युवावर्गात ‘विविध डे’ साजरे करण्यासाठी जणू स्पर्धाच दिसून येत आहे. त्यामुळे तरुणाई आजच्या हायटेक युगात सोशल मीडियावर यांत्रिक युगात प्रेमपत्राची जागा मेसेजने घेतली आहे.

त्यामुळे ‘प्रपोज डे’च्या दिवशी अधिक सक्रिय असलेल्या तरुणांकडून विविध पोस्ट व्हायरल होत आहेत. व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसह विविध माध्यमांवर तरुणाई मग्न असल्याचे चित्र आहे.

प्रेमपत्र काळाच्या पडद्याआड

आपल्या आवडत्या व्यक्तीला हटके पद्धतीने प्रपोज करावे, असे प्रत्येकाला वाटते. पूर्वी प्रेमपत्र, गुलाबाचे फूल देऊन प्रेम व्यक्त केले जात होते. आता मात्र, मोबाईलवर फिल्मी डायलॉगचा भडिमार होणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Valentine Week List 2023
Jalgaon News : मुख्यमंत्र्यांना लिहिले तब्बल 52 हजार पोस्टकार्ड!

त्यामुळे प्रेमाची कबुली देण्याचे विविध फंडे तरुणाई वापरत आहे. डिजिटलमुळे हे सगळे सोपे झाले असले, तरी प्रेमपत्र हा प्रकार इतिहासजमा आहे. त्यामुळे सध्या तंत्रज्ञानाच्या युगात समाजमाध्यमांवर प्रेम व्यक्त करण्याचा नवा ट्रेंड आल्याने प्रेमपत्र कालबाह्य झाले आहेत.

"व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध रंगांची गुलाबाची फुले उपलब्ध झाली आहेत. आता आठवडाभर फुलांना चांगली मागणी राहणार आहे. त्यामुळे १० रुपयांना मिळणारे लाल गुलाब १५ ते २० रुपये प्रतिनग होण्याची शक्यता आहे." -संजय बारी, फूलविक्रेता

असे साजरे झाले दिन

मंगळवारी (ता. ७) ‘रोझ डे’ होता. प्रेमात पडलेल्या, पडू पाहणाऱ्यांनी एकमेकांना गुलाबाचे फुल देत हा दिन साजरा केला.

Valentine Week List 2023
Amrut 2.0 Scheme : ‘अमृत’चा प्रस्ताव पालकमंत्र्यांच्या दरबारात

शहरातील मेहरुण तलाव, बहिणाबाई उद्यान, महात्मा गांधी उद्यानात, तर काहींनी महाविद्यालयाच्या परिसरात रोझ देण्या-घेण्याचा कार्यक्रम केला. तर काहींनी शीतपेयांची दुकाने, कॅफेमध्ये एकांत साधत हा दिन साजरा केला.

बुधवारी (ता. ८) ‘प्रपोज डे’ला अनेकांनी एकमेकांना प्रपोज करीत प्रेमाची कबुली दिली. गुरुवारी (ता. ९) ‘चॉकलेट डे’ साजरा झाला. शुक्रवारी (ता. १०) ‘टेडी डे’निमित्त अनेकांनी मुलींना टेडी दिल्या. शनिवारी (ता. ११) ‘प्रॉमिस डे’, रविवारी (ता. १२) ‘हग डे’, तर सोमवारी (ता. १३) ‘किस डे’, तर मंगळवारी (ता. १४) ‘व्हॅलेंटाइन डे’ आहे.

Valentine Week List 2023
KBCNMU : उमवित 2 दिवसीय NET SET, PET कार्यशाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.