Forest Department Update : 5 लाख रुपये किंमतीचे सागवानी लाकूड वनविभागाकडून जप्त

Forest Department Update
Forest Department Updateesakal
Updated on

चोपडा: मध्य प्रदेशातील धवली परीक्षेत्रातील धामण्या येथे अवैध पाच लाखांचे सागवान लाकूड महाराष्ट्र व मध्य प्रदेश वन विभागाच्या संयुक्त कारवाईतून जप्त करण्यात आले. यात दोन लाकूड कटाई मशिन, फर्निचर व कच्चा माल जप्त करण्यात आला आहे.

ही गुप्त माहिती यावल वन विभागाकडून मध्य प्रदेश विभागाला देण्यात आली आणि संयुक्तपणे मोठी कारवाई करण्यात वन विभागाला मोठे यश मिळाले आहे. यात चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे.(Forest Department Update Teak wood worth Rs 5 lakh seized by forest department Jalgaon Crime News)

Forest Department Update
Crime News Jalgaon : विद्यार्थ्याने केली शाळेच्या आवारातच शिक्षकास मारहाण

या कारवाईत मध्य प्रदेशातील धामण्या येथील विनोद डोंगरसिंग, राजू दरबार, टोनीराम सुमला, सायसिंग पठाण यांना घरात असलेल्या लाखोंच्या अवैध सागवान लाकडाचा मुद्देमालासह पकडण्यात आले.

घरात आढळून आलेला मुद्देमाल सेंधवा फॉरेस्ट डेपोत हलविण्यात आला आहे. हे सागवानी लाकूड हे महाराष्ट्रातून कापून ते चोरट्या मार्गाने मध्य प्रदेशात नेऊन त्या लाकडाचे फर्निचर करून सर्रासपणे विक्री केले जात असल्याचा प्राथमिक अंदाज वैजापूर येथील आरएफओ एस. एम. सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.

या वेळी सहायक वनरक्षक प्रथमेश हडपे, आरएफओ एस. एम. सोनवणे, बी. के. थोरात, वैजापूरचे आय. एस. तडवी, वनपाल चुनिलाल कोळी, बाजीराव बारेला, संदीप भोई, गस्तिपथक वनरक्षक योगेश सोनवणे वनरक्षक, सचिन तडवी, आनंद तेली व निखिल पाटील, धवली रेंजर हेमंत प्रजापती, रजनेश त्रिपाठी, अर्जुनसिंग सेंधवा यासह वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Forest Department Update
Diwali Special : दिवाळी किटचे 6 लाख लाभार्थ्यांना वाटप सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()