Farmer Study Tour : महाराष्ट्रातील जमिनीत चांगल्या हळदीचे उत्पादन शक्य : डॉ. निर्मल बाबू

farmer study tour
farmer study touresakal
Updated on

जळगाव : महाराष्ट्रातील जमिनीचा पोत पाहिला असता, बेड पद्धत आणि जैन ठिबकसह, काटेकोर पाणी (Water) व खत व्यवस्थापनातून सेलमसह अन्य लोकप्रिय हळदीच्या वाणांचे उत्पादन घेता येऊ शकते. (Former Director of Research Department Dr Nirmal Babu expressed Good production of turmeric is possible in soil of Maharashtra jalgaon news)

हमीभावाच्या करार शेतीतून प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीचा मार्ग मिळेल, असा विश्वास केरळच्या आयसीएआर आयआयएसआरचे स्पाईस संशोधन विभागाचे माजी संचालक डॉ. निर्मल बाबू यांनी व्यक्त केला.

जैन हिल्सवर सुरू असलेल्या शेतकरी अभ्यास दौऱ्यानिमित्त डॉ. निर्मल बाबू शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, कृषी संशोधन प्रात्यक्षिक विभागाचे संजय सोनजे या वेळी उपस्थित होते.

जैन इरिगेशनच्या कृषी संशोधन प्रात्यक्षिक विकास केंद्रावर देशभरातील १९ हळदीच्या जातींचे उत्पादन घेण्यात आले. यात कान्हदेशातील लोकप्रिय सेलमसह मेघा, राजेंद्र सोनाली, राजेंद्र सोनिया, पितांबर, सिक्कीम लोकल यांचा समावेश आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

farmer study tour
Jalgaon News : खानदेशासाठी जळगावात विभागीय कार्यालय; मुख्यमंत्र्याची घोषणा

हळदीमध्ये कर्क्यूमिन या आरोग्यादृष्ट्या महत्त्वाचा गुणधर्म असलेला घटक असतो. त्याचप्रमाण कान्हदेशातील जास्त प्रमाणात लावली जाणारी व्हरायटी सेलम यात दिसतो. जैन हिल्सवरील संशोधन प्रात्यक्षिक केंद्रात बेड, वाफसा पद्धत, मल्चिंगचा वापर यासह दोन ड्रीप लाईनद्वारे सिंचन दिले गेले.

यातून योग्य वेळी पाण्याचा ताण देऊन फर्टिगेशन यंत्रणेद्वारे खते देता आली. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी जवळपास एकरीप्रति २२ ते २३ टन उत्पादन घेतल्याचे डॉ. निर्मला बाबू म्हणाले.

स्मृती भ्रंश, कर्करोगसह अन्य आजारांवर हळद गुणकारी असल्याचे अनेक निष्कर्ष समोर आले आहेत. यासह अन्य महत्त्वांमुळे हळदसह मसाल्यांची अन्य पिकाला जागतिक मागणी वाढत आहे.

असे असताना जैन इरिगेशनच्या पांढरा कांदा करार शेतीच्या धर्तीवर करार शेती करून उत्पन्न घेऊन महाराष्ट्र मुख्य पुरवठादार म्हणून आणखी पुढे येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करीत कीडनियंत्रणासह अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर टाळून हळद पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहनही डॉ. निर्मला बाबू यांनी केले.

farmer study tour
Eknath Shinde | कामांतून विरोधकांना उत्तर देतोय : एकनाथ शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.