Jalgaon News : माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी १९९० मध्ये झालेल्या कारसेवेच्या स्मृतींना उजाळा दिला.
मुक्ताईनगरसह जळगावातही खडसेंचे कारसेवक म्हणून श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे शुभेच्छा फलक झळकत असताना त्यांनी नव्वदीतील कारसेवा समिती सदस्यांची यादीही ‘शेअर’ केली आहे. (Former minister and senior leader MLA Eknath Khadse brought to light memory of Karseva held in 1990 jalgaon news)
प्रभू रामाच्या अयोध्येतील मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्सवाचे वातावरण आहे. सोमवारी (ता. २२) हा उत्सव साजरा होत असून, जळगाव शहरासह जिल्ह्यात उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.
विविध नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भगवे ध्वज, फलक, श्रीरामाचे मोठमोठे कटआऊट लावले आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसेंचेही कारसेवक म्हणून मुक्ताईनगरात, जळगाव शहरात मोठमोठे फलक लावण्यात आले. या फलकांवर प्रामुख्याने स्वत: खडसेंसह रोहिणी खडसेंचेही छायाचित्र आहे.
नव्वदीच्या कारसेवेत सक्रिय
खडसेंनी १९९० मध्ये झालेल्या कारसेवेत सक्रिय सहभाग नोंदविला होता. जिल्ह्याच्या समितीत त्यांचा समावेश होता. ‘चलो अयोध्या’चा नारा देत या समितीने जिल्ह्यात काही कार्यक्रमही जाहीर केले होते.
त्यात जनसंकल्प दिन, विजय यात्रा समारंभ व श्री प्रभुराम ज्योती यात्रा असे कार्यक्रम नियोजित होते. जिल्हा कार सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून भुसावळचे प्रभाकर गुर्जर यांच्याकडे जबाबदारी होती, तर चंदनमल राठी कोशाध्यक्ष, बापू मांडे समितीचे संयोजक होते.
हे सदस्यही होते सहभागी
सदस्यांमध्ये स्वामी वासुदेव प्रपन्न महाराज (चिनावल), चिमणराव दादाजी ठाकरे (मंगरूळ, ता. चोपडा), सोनू दुला पाटील (न्हावी, यावल), सुधाकरबुवा मुकीम (रावेर), राजेश्वर बुवा निजामपूरकर (जळगाव), राजाराम शास्त्री महाराज (असोदा)
घनश्याम महाराज (फैजपूर), गुरुमहाराज कल्याणदासजी (नांद्रा, पाचोरा), बनस्वामी महाराज (पाचोरा), दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान (चोपडा), खासदार उत्तमराव पाटील (चाळीसगाव), आमदार हरिभाऊ महाजन (एरंडोल), आमदार एकनाथ खडसे, आमदार ईश्वर जाधव (चाळीसगाव), गुणवंतराव सरोदे, ॲड. शिवाजीराव पालवे (चाळीसगाव)
राजेंद्र पाटील (पाचोरा), जगदीश कापडे (भुसावळ), प्रकाश जगताप (जळगाव), ॲड. अच्युतराव अत्रे (जळगाव), डॉ. सुनील घाटे (चाळीसगाव), वा. ग. पूर्णपात्रे (चाळीसगाव), डॉ. अविनाश आचार्य, डॉ. प्र. अ. खटावकर, डॉ. अनिल आचार्य, प्रा. डॉ. विश्वासराव पाटील, डॉ. व्ही. आर. तिवारी.
चंद्रकांत मेंडकी, देसराज अग्रवाल, प्रभाताई कुलकर्णी, किशोरीताई मुंदडा, भास्करराव बनसोडे, प्रा. वि. ह. नेमाडे, एस. एस. पाटील, द. त्र्यं. कमळे, लक्ष्मणराव पाटील, प्रभूशेठ चौधी, वाय. जी. महाजन, माधवराव भोकरीकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.