जळगाव : शहरातील तळेले कॉलनीतील दत्तमंदिराजवळ कारच्या बोनटवर ठेवली दागिन्यांची पर्स नजर चुकताच चोरट्याने लंपास केली. चोरट्याने चार लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
शहरातील जुना निमखेडी रोडवरील तळेले कॉलनीतील मनीषा चंद्रशेखर पाटील (वय ४२) नाशिक व पनवेल येथे स्वामी कन्ट्रक्शन व कन्सलटन्सीचे काम करतात. शनिवारी (ता. २८) व रविवारी (ता. २९) त्या जळगावच्या घरी येत असतात. (Four and a half lakh theft by thieves with cash and jewellery In afternoon purse extended from car bonnet outside house Jalgaon News)
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
त्यांचा पुतण्या रुपेश दिलीप पाटील (रा. चिनावल, ता. रावेर) याचे लग्न असल्याने मनीषा पाटील २७ जानेवारीला लग्नसाठी आल्या होत्या. लग्न आटोपून शनिवारी कुटुंबासह तळले कॉलनीतील घरी परतल्या. गाडीतून सामान उतरवून घरात गेल्या. हातातील पर्स त्या गाडीच्या बोनवटवरच विसरल्या. मात्र, चोरट्याने पर्स लंपास केली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर तपास करीत आहेत.
कारला ठोसा लागल्याचे पाहणे पडले महागात
मनीषा पाटील कार (एमएच १९, डीव्ही ८७००)ने दुपारी घरी परतल्या. मात्र, चिनावलकडून जळगावकडे येताना पाडळसा ते बामणोद येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने लावलेल्या बॅरिकेट्स कारच्या बंपरला धडकले होते.
पाटील कुटुंब तळेले कॉलनीत घरी परतल्यावर नेमके काय नुकसान झाले, हे बघण्यासाठी मनीषा पाटील यांनी हातातील पर्स बोनटवर ठेवली आणि खाली वाकून गाडीला लागलेला ठोसा पाहिला. मात्र, पर्स तशीच सोडून त्या घरात निघून गेल्या. हीच संधी चोरट्यांनी साधून बोनटवरील पर्स अलगद लांबविली. पर्समध्ये २ लाख १५ हजार रुपयांचा चपला हार, ४० हजारांचे कानातील टॉप्स, ६० हजारांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, ६० हजारांची सोन्याची चैन, १२ हजारांचा चांदीचा छल्ला, दहा हजारांचा मोबाईल, ४० हजारांची रोकड होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.