Jalgaon News : चक्रीवादळात झोक्यातील 4 महिन्याची बालीका उडून 50 फुटावर पडल्यामुळे गंभीर जखमी

Four month old baby girl was seriously injured in Hurricane
Four month old baby girl was seriously injured in Hurricaneesakal
Updated on

Jalgaon News : येथील मदिना कॉलनीतील एका घरातील छताच्या पाईपाला झोळीत चार महिन्याची बालिका काल रात्री झालेल्या चक्री वादळामुळे पत्रे, अँगल, पाईप व झोक्या सहीत बालिका उडून गंभीर जखमी झाली.

तिच्यावर बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे .तिचे आई ,वडील किरकोळ जखमी झाले आहे. (Four month old baby girl was seriously injured after falling 50 feet during a cyclone Jalgaon News)

Four month old baby girl was seriously injured in Hurricane
Jalgaon News : फोटोसह मतदारयाद्यांसाठी पुर्नरिक्षण कार्यक्रम जाहीर; या तारखेला अंतिम यादी होणार प्रसिद्ध

याबाबतची वृत्त असे की कल रात्री झालेल्या चक्रीवादळामुळे येथील ईदगाह रोडवरील मदिना कॉलनीतील हरीसखान रईसखान यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील घराचे पत्रे ,अँगल व पाईपासह चक्रीवादळामुळे उडाले होते घराच्या पाईपाला दोरीचा झोका बांधून त्यांची अनबिया हरीशखान (वय चार महिने) ही झोपली होती.

मात्र पत्र्यासहित पाईप ,झोका व त्यातील बालीका या वादळामुळे उडून घराच्या मागील बाजूस सुमारे शंभर ते दीडशे फूट अंतरावर पत्र्यासह खाली पडला . यानंतर पाऊसवादळ शांत झाल्यावर या मुलीची शोधाशोध करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Four month old baby girl was seriously injured in Hurricane
Jalgaon News : फोटोसह मतदारयाद्यांसाठी पुर्नरिक्षण कार्यक्रम जाहीर; या तारखेला अंतिम यादी होणार प्रसिद्ध

सदर मुलगी बालिका पत्र्याखाली गंभीर अवस्थेत मिळून आली . तिला तात्काळ बऱ्हाणपूर येथील ऑल इज वेल रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहे .

दरम्यान तिचे वडील हरीसखान रईसखान (वय ३०) व त्यांची पत्नी आशयमाबी व ( वय २८) हे किरकोळ जखमी झाले आहेत . माजी नगरसेवक अयुबखान, शेख सादिक, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शेख मेहमूद यांनी भेट दिली.

Four month old baby girl was seriously injured in Hurricane
Nashik News : नाशिक जिल्हा ‘अलर्ट’ मोडवर! आक्षेपार्ह पोस्टवर सायबरची करडी नजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.