जळगाव : एरंडोलजवळ कारचा भीषण अपघात, चार जागीच ठार, एक गंभीर

Four people killed and one seriously injured in terrible car crash near Erandol
Four people killed and one seriously injured in terrible car crash near Erandol
Updated on

एरंडोल (जि. जळगाव) : जामडी (ता. चाळीसगाव) येथील परदेशी कुटुंबातील पाच जण विवाहासाठी जळगाव येथे जात असताना एरंडोल नजीक त्यांची कार समोरील वाहनाला धडकली, यात कार चालकासह चार जण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला आहे.

भरधाव वेगाने जाणाऱ्या एसयुव्ही कारने रस्त्यावर उभ्या ट्रकला मागील बाजूने धडक देत जामडी (ता.चाळीसगाव) येथील चार जण जागीच ठार तर एक जखमी झाला. ठार झालेल्यांमध्ये एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टराचा समावेश आहे. अपघातात मृत सर्वजण जळगाव येथे मित्राला सोडण्यासाठी जात होते. हा अपघात आज सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पिंपळकोठा (ता.एरंडोल) गावाच्या प्रवेशद्वाराजवळ झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली होती.

Four people killed and one seriously injured in terrible car crash near Erandol
परीक्षेनंतर मामाकडे आलेली नववीची मुलगी गरोदर; दोन वेळा अत्याचार

घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की जामडी (ता.चाळीसगाव) येथून परदेशी परिवारातील सदस्य भडगाव येथे बुधवारी (ता.२३) विवाहासाठी महिंद्रा एक्स.यु.व्ही. (क्रमांक : एम.एच.१९ सी.झेड ७३६०) ने आले होते. विवाह समारंभ आटोपल्यानंतर सर्वजण कार ने एरंडोल ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर तुषार उर्फ जयदीप मदनसिंग परदेशी यांना भेटण्यासाठी एरंडोल येथे आले.

डॉ. तुषार परदेशी हे रिंगणगाव येथे गेले असल्यामुळे त्यांना घेण्यासाठी ते रिंगणगाव येथे गेले. त्यांना जळगाव येथे घरी सोडण्यासाठी जात असताना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या त्यांच्या कार चालकाचा निंयत्रण सुटल्याने पिंपळकोठा गावाच्या प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या ट्रक (क्रमांक एम.एच.१८ ए.ए.८८५७) ला मागील बाजूने जोरदार धडक दिली. यात कारमधील विजयसिंग हरी परदेशी,चतरसिंग परमसिंग परदेशी (वय ३८; सर्व राहणार जामडी ता. चाळीसगाव), डॉ. तुषार उर्फ जयदीप मदनसिंग परदेशी (वय ३५ रा.जळगाव) आणि रवींद्र उर्फ आबा रामचंद्र पाटील (वय ५८, रा. वडजी ता.भडगाव) चार जण जागीच ठार तर रायसिंग पद्‌मसिंग परदेशी (रा. जामडी ता. चाळीसगाव) हे जखमी झाले.

Four people killed and one seriously injured in terrible car crash near Erandol
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीचा विचार करताय? काय आहेत बेस्ट ऑप्शन, वाचा

अपघात इतका भयानक होता की भरधाव वेगाने जाणारी कार उभ्या ट्रकच्या मागील बाजूने आत घुसली होती. अपघात होताच जोरदार आवाज झाल्याने पिंपळकोठा परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत मदत कार्यास सुरुवात केली.

Four people killed and one seriously injured in terrible car crash near Erandol
काही दिवसांत महाविकास आघाडीबाबत करणार नवा खुलासा; फडणवीसांचा इशारा

तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लहू चव्हाण, कुंदन बडगुजर, गुलाब बडगुजर, मनोज बडगुजर, उमर खान, राधेशाम बडगुजर, राजू बडगुजर, ईश्वर पाटील, सागर बडगुजर, दीपक कैकाडी, दीपक बडगुजर, ज्ञानेश्वर पाटील, मुकेश माळी यांच्यासह ग्रामस्थांनी अपघातग्रस्त कारमधून मृतदेह बाहेर काढले. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, हवालदार अनिल पाटील, पंकज पाटील, महेंद्र पाटील, मिलिंद कुमावत, अकिल मुजावर, विकास खैरनार, महेंद्र चौधरी यांच्यासह ग्रामस्थांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरु केली. अपघातात मयत डॉ. तुषार परदेशी हे ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आहे. त्याच रूग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्याची वेळ सहकार्यांवर आल्याने वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचारी निशब्द झाले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.