jalgaon : रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी उपोषणाचा चौथा दिवस; प्रशासनाचे दुर्लक्ष

Jalgaon
Citizens gather to support Sridhar Chaudhary's hunger strike
Jalgaon Citizens gather to support Sridhar Chaudhary's hunger strikeesakal
Updated on

जळगाव : शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीधर विष्णू चौधरी महापालिकेसमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.

मात्र, चार दिवस उलटूनही प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी शुक्रवारी (ता. ४) सकाळी दहाला नागरिक महापालिकेसमोर निदर्शने करणार आहेत. (Fourth day of hunger strike to plug potholes Neglect of Administration Jalgaon News)

Jalgaon
Citizens gather to support Sridhar Chaudhary's hunger strike
Jalgaon: पदवीधर नोंदणीबाबत शासनाची उदासीनता; ऐन सणासुदीत मतदारयादीचा कार्यक्रम

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला शहरातील जनतेकडून पाठिंबा मिळत आहेत. मात्र, प्रशासनाला त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यांच्याशी चर्चा करण्यासही अधिकारी तयार नाहीत. त्यामुळे आता नागरिक संतप्त झाले आहेत.

शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आपण उपोषण सुरू केले आहे. मात्र, प्रशासनाचे कोणीही चर्चेस आलेले नाही. त्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी शुक्रवारी सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान नागरिकांनी महापालिका सतरा मजली इमारतीसमोर येऊन निदर्शने करावीत व उपोषणाला साथ द्यावी, असे अवाहनही त्यांनी केले आहे.

Jalgaon
Citizens gather to support Sridhar Chaudhary's hunger strike
District Milk Union Election: निवडणुकीसाठी 79 अर्जांची विक्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()