जळगाव : स्टेट बॅंकेतून 7 लाखांचे कर्ज घेऊन फसवणूक

fraud
fraudesakal
Updated on

जळगाव : बनावट दस्ताएवज (Forged documents) सादर करून स्टेट बॅंकेकडून (SBI) ७ लाखांचे कर्ज घेऊन ते न फेडता बॅंकेची फसवणूक (Bank fraud) केल्याप्रकरणी गायत्रीनगरातील जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (Fraud by taking loan of Rs 7 lakh from State Bank Jalgaon crime news)

fraud
Jalgaon : उमवित- पीपल्स बँकेत आरोग्य तपासणी करार

शहरातील गायत्रीनगरात राहणारा पवन अमरनाथ मिश्रा याने बनावट दस्तऐवज खरे असल्याचे भासवून स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत कर्ज प्रकरण टाकले होते. बँकेने सर्व दस्तऐवज कागदपत्रांची पडताळणी करून मिश्रा याला ७ लाखांचे कर्ज मंजूर करून ते ३ फेब्रुवारी २०२२ रोजी अदा केले. बँकेकडून कर्जप्राप्ती झाल्यानंतर कर्जाच्या हप्त्याच्या तारखा सुरु झाल्या, मात्र कर्जाचे हप्तेच भरले जात नसल्याने बँकेतून संबंधित ग्राहकाला संपर्क करण्यात आला. तर, मोबाईल बंद असल्यामुळे घर गाठून चौकशी केली तर घरसुद्धा बंद होते. अखेर त्याची माहिती घेतली असता तो अनेक दिवसांपासून घरीच आलेला नसल्याचे शेजारच्यांनी सांगितले. बँक अधिकाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांना कळवले. गुरुवारी बँक मॅनेजर सिसीर पटनायक यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून पवन अमरनाथ मिश्रा याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार करत आहेत.

fraud
वाघूर धरणाच्या लाभ क्षेत्रात 2020 शेततळ्यांची निर्मिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()