जळगाव : जिल्ह्यात १६ लाख नागरिकांना कोविड लसीकरणाचा (बुस्टर) तिसरा डोस घेणे आवश्यक होते. मात्र, शुक्रवार (ता. ३०)पर्यंत केवळ ३ लाख ५३ हजार ६१६ नागरिकांनी (२२.६१) बूस्टर डोस घेतला आहे.(free booster dose closed in jalgaon district only 20 percent people vaccinated)
बूस्टर लसीकरणास पात्र असलेल्या तब्बल १३ लाख नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याकडे पाठ फिरविली. यावरून नागरिक मोफत लसीकरणाविषयी किती जागरूक आहेत, याची प्रचिती येते. आता बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागणार आहेत.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त १५ जुलैपासून मोफत बूस्टर डोस देणे शासनाने सुरू केले होते. शुक्रवारी मोफत लसीकरणाचा शेवटचा दिवस होता. जिल्ह्यात कोरोनाच्या दोन ते तीन लाटांमध्ये अपरिमित हानी झाली. कोरोना प्रतिबंधक लस देशात उपलब्ध झाल्यानंतर १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू झाले.
प्राथमिक स्तरावर फ्रंट लाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले. त्यानंतर ६० वर्षे वयोगटावरील नागरिक, नंतर ४५ वर्षांवरील, १८ वर्षावरील, १५ ते १७ वर्षांवरील लसीकरण मोहीम झाली. आता १२ ते १४ वर्षांवरील लसीकरणम मोहीम सुरू आहे.
जानेवारी २०२२ पासून जळगावमध्ये एका खासगी केंद्रावर बूस्टर लस उपलब्ध होती. बहुतांश जिल्ह्यांमध्ये खासगी लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीचा बूस्टर डोस मोफत देण्याचे जाहीर केले.
१५ जुलैपासून मोफत बूस्टर डोस लसीकरण मोहीम राबविली गेली. दरम्यान, सध्यास्थितीत कोरोना संसर्ग परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे याचा परिणाम लसीकरण मोहिमेवरही दिसून येत आहे.
जिल्ह्यात वयोगटानूसार झालेले लसीकरण
वयोगट--उद्दिष्ट--लसीकरण पूर्ण--टक्केवारी
१२ ते १४---१ लाख ४६ हजार ३४--७ हजार ९८९--४८.६१
१५ ते १७---२ लाख २५ हजार ७७३--१ लाख १० हजार ४१५---४८.९१
१८ वर्षांवरील--३४ लाख ६ हजार ५२४--२३ लाख ३१ हजार १०५--६८.४३
आकडे बोलतात...
लसीकरणास पात्र : ३७ लाख ७८ हजार ३३१
पहिला डोस घेतलेले : ३० लाख ५४ हजार ९८८ (८०.८६ टक्के)
दुसरा डोस घेतलेले : २५ लाख १२ हजार ५०९ (६६.५०)
बूस्टर डोस घेतलेले : ३ लाख ५३ हजार ६१६ (२२.६१)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.